९ वर्षाच्या बालिकेवर वृद्धाकडून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 05:03 PM2019-04-22T17:03:29+5:302019-04-22T17:03:52+5:30

संतापजनक : उत्राण येथील भर दुपारचा प्रकार

Rape from old age of 9 year old boy | ९ वर्षाच्या बालिकेवर वृद्धाकडून बलात्कार

९ वर्षाच्या बालिकेवर वृद्धाकडून बलात्कार

Next

कासोदा, ता. एरंडोल : येथून जवळच असलेल्या उत्राण येथे २१रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास लोटन फकीरा पाटील या ६५ वर्षाच्या वृद्धाने ९ वर्षीय बालीकेवर बलात्कार केल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे.
लोटन पाटीलची नात व पिडीत मुलगी या दोघी मैत्रिणी आहेत, या दोघी मैत्रिणी दुपारी एकत्र खेळत असतांना या नराधमाने पिडीतेला आपल्या रहात्या घरात नेले व तेथे हे दुश:कृत्य केले. त्यानंतर मुलगी घरी आल्यानंतर तिच्या आईला या बालीकेचा रक्तबंबाळ अवतार दिसल्यावर तिने अधिक चौकशी करता हा सगळा प्रकार मुलीने आईला सांगीतला.
ही मुलगी थोडी मतीमंद असल्याची पण माहिती मिळाली आहे. त्यानंतर या महिलेने कासोदा पोलीस ठाणे गाठल. घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीसांनी त्वरीत उत्राण गाठत आरोपीला ताब्यात घेतले.
रक्ताने माखलेले कपडे जप्त केले
आरोपीला कासोदा येथे आणल्यावर त्याची वैद्यकीय तपासणी डॉ. फिरोज शेख यांनी केली, तर मुलीला तपासणी साठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे.
भादविक.३७६अ.भ.व बालिका लैंगीक अत्याचार संरक्षण कायदा कलम ४ ५ ६ अन्वये गुन्हा दाखल झाला झाला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.

Web Title: Rape from old age of 9 year old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.