मुंबईच्या विवाहितेवर चाळीसगावात लॉजमध्ये बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 05:07 PM2019-07-12T17:07:54+5:302019-07-12T17:08:52+5:30

दुसऱ्याच्या मोबाईलवर चुकून लागलेल्या रॉंग नंबर मुंबईतील २९ वर्षीय विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्थ करणारा ठरला. रॉंग नंबर लागलेल्या या नंबरच्या महिलेशी सुत जुळवून चाळीसगावच्या दोघांनी तिला बसस्थानकासमोरील विनायक लॉजवर नेऊन तिच्यावर तब्बल पाच दिवस अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Rape in the Lodge at Chalisgaon on Mumbai's wedding | मुंबईच्या विवाहितेवर चाळीसगावात लॉजमध्ये बलात्कार

मुंबईच्या विवाहितेवर चाळीसगावात लॉजमध्ये बलात्कार

Next
ठळक मुद्देदोघांना पोलिसांकडून अटकघटनेने चाळीसगावात खळबळ

चाळीसगाव, जि.जळगाव : दुसऱ्याच्या मोबाईलवर चुकून लागलेल्या रॉंग नंबर मुंबईतील २९ वर्षीय विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्थ करणारा ठरला. रॉंग नंबर लागलेल्या या नंबरच्या महिलेशी सुत जुळवून चाळीसगावच्या दोघांनी तिला बसस्थानकासमोरील विनायक लॉजवर नेऊन तिच्यावर तब्बल पाच दिवस अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्यावर कोसळलेली ही आपबित्ती या पीडित महिलेने पतीला सांगितल्यावर मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्टेशनचा हा गुन्हा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. महिलेवर अत्याचार करणाºया दोघांपैकी एकाला धुळे, तर दुसºयाला चाळीसगाव येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेने चाळीसगावात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती अशी की, संशयित आरोपी आकाश प्रल्हाद रोकडे रा.धुळे याने काही दिवसांपूर्वी आपल्या भावाला मोबाईलवरून फोन केला. हा फोन चुकून मुंबईतील चेंबूर भागात राहणाºया २९ वर्षीय महिलेला लागला. रॉंग नंबर लागला असे सांगत संभाषण संपले. त्यानंतर मात्र ती पीडित महिला रोकडे याच्याशी संपर्कात आली. दोघांमध्ये मोबाईलवरून बोलणे वाढले. माझे पतीशी जमत नाही, तो सतत मारहाण करतो, जीवन जगावेसे वाटत नाही, जीवाचे बरेवाईट करून घेईल, असे या पीडित महिलेले रोकडे याच्याशी बोलण्याच्या नादात सांगून टाकले. त्यावर रोकडे याने असे करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगत महिलेची सहानुभूती मिळवली. त्यानंतर दोघांमध्ये वेळोवेळी मोबाइलवरून संभाषण होत राहिले. ही संधी साधून रोकडे याने या पीडित महिलेला चाळीसगावी बोलावले. रोकडे याचा मित्र करण राजाराम राखपसरे रा.इंदिरानगर, चाळीसगाव याला ही गोष्ट सांगितली. चाळीसगावी ही महिला आली असता या दोघांनी तिला चाळीसगाव बसस्थानकासमोरील विनायक लॉजमध्ये नेऊन दि.१९ ते २३ जून दरम्यान वेळोवेळी संगनमताने या महिलेवर बलात्कार केला.
या दरम्यान या पीडित महिलेच्या मोबाईलवर तिच्या पतीसह नातलगांचे फोन येत असत. मात्र संशयित करण राखपसरे व आकाश रोकडे हे दोघे महिलेला मोबाईलवरून बोलू देत नसत. या दोघांचा अत्याचार असह्य झाल्याने पीडित त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी धडपडत होती. अशात एक दिवस पतीचा फोन आला असता तिने तो उचलला व आपण भावनेच्या भरात चाळीसगावी कसे आले आणि आपल्यावर दोघांनी कसा अत्याचार केला, अशी माहिती दिली. आपल्यावर झालेल्या अत्याचारामुळे हबकलेल्या पीडित विवाहितेने दोघा संशयितांची नजर चुकवत नाशिक गाठले. तेथून त्र्यंबकेश्वर येथे गेली. तेथे पती आल्यावर त्याला गुदरलेली सर्व आपबित्ती सांगितली.
महिलेवर वारंवार अत्याचार झाला असल्याने तिची प्रकृती बिघडली. तिच्यावर औषधोपचार केल्यानंतर पीडित महिला पतीसह मुंबईत गेली. तेथे त्यांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला. चुनाभट्टी पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित करण राजाराम राखपसरे व आकाश प्रल्हाद रोकडे या दोघांच्या विरोधात भादंवि कलम ३७६ प्रमाणे शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदवून घेत तो चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडे वर्ग केला.
चाळीसगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक युवराज रबडे, पो.ना. नितीन पाटील, पोकॉ राहुल गुंजाळ, राकेश पाटील,मझरद्दीन शेख यांच्या पथकाने पीडित महिलेवर अत्याचार करणाºया दोघा संशयितांपैकी आकाश रोकडे याला धुळ्याहून, तर करण राखपसरे याला चाळीसगाव येथून अटक केली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील हे करीत आहेत.

Web Title: Rape in the Lodge at Chalisgaon on Mumbai's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.