रमजान महिन्याला उद्यापासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:35 PM2018-05-17T18:35:55+5:302018-05-17T18:35:55+5:30

मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याला शुक्रवार, १८ पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त शहरातील मशिदीमध्ये तयारी सुरु आहे. उपवास सोडण्यासाठी फळे, खजूर व शेवया विक्रीची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली आहेत.

Ramjan month starts from today | रमजान महिन्याला उद्यापासून प्रारंभ

रमजान महिन्याला उद्यापासून प्रारंभ

Next
ठळक मुद्देसत्कृत्याचा संदेश देणारा रमजान महिनारोजा धर्माचरणाच्या पाच स्तंभापैकी एकआनंदी राहण्याचा संदेश देतो रमजान महिना

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१७ : मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याला शुक्रवार, १८ पासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त शहरातील मशिदीमध्ये तयारी सुरु आहे. उपवास सोडण्यासाठी फळे, खजूर व शेवया विक्रीची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली आहेत.
५ वेळा नमाज व १२ तासांचा रोजा
मुस्लिम या शब्दाचा अर्थ अल्लाच्या आज्ञांचे पालन करणारा किंवा शांततेचे रक्षण करणारा असा केला जातो. रमजान महिन्यात दिवसा व रात्री मिळून पाच वेळा नमाज अदा केली जाते. सलग ३० दिवस रोजा (उपवास) धरले जातात. हा रोजा १२ तासांचा असतो.
आनंदी राहण्याचा संदेश देतो रमजान महिना
रोजा करीत असताना सूर्योदयापासून अन्नपाण्याचा त्याग केला जातो. रमजान महिन्याचे पहिले १० दिवस ईश्वरी कृपेचे, पुढील १० दिवस भक्तीचे आणि शेवटचे १० दिवस रोजादाराचे संरक्षणासाठी केले जाते. रमजानचा मुख्य संदेश आनंदी रहा असाच आहे.
रोजा धर्माचरणाच्या पाच स्तंभापैकी एक
संपूर्ण महिना उपवास-रोजे केल्यानंतर तिसाव्या रोजानंतर ईद येते. पवित्र कुरआन याच महिन्यात अवतरले असल्यामुळे इस्लाममध्ये रमजानला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इस्लाममधल्या एकमेव अल्लावरील श्रद्धा, नमाज, रोजे, जकात आणि हज या धर्माचरणाच्या पाच स्तंभांपैकी एक असल्यामुळे या रोजांना विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त आहे.
सत्कृत्याचा संदेश देणारा रमजान महिना
रमजान हा सत्कृत्यांचा बहर येण्याचा महिना आहे. प्रत्येक माणसाच्या मनात सत्कृत्य करण्याची उर्मी निर्माण होते. एखाद्या दु:खपीडिताचे दु:ख हलके करावे. एखाद्या जागी जर सत्कृत्य होत असेल तर त्यात सहभागी व्हावे असा संदेश या महिन्यात दिला जातो.
फळे खरेदीसाठी बाजारपेठेत गजबज
खजूर, पपई, शेवया यासह विविध फळांची दुकाने लावण्यात आली आहे. गुरुवारी शहरातील प्रमुख बाजारपेठेत मुस्लिम बांधवांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

 

Web Title: Ramjan month starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव