A rally on the District Collectorate | जळगाव येथे भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर होणाऱ्या खोट्या आरोपांच्या विरोधात तसेच गुरुजींना समर्थन देण्यासाठीशिवप्रतिष्ठान हिंदूस्थान जळगाव विभागाच्यावतीने बुधवार, २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सन्मान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने शहरवसीयांचे लक्ष वेधून घेतले.
सकाळी ११ वाजता शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले व जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात शिवप्रतिष्ठानचे धारकरी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, संघ, हिंदू महासभा यांच्यासह समस्त हिंदूत्ववादी संघटना व जिल्हाभरातील कार्यकर्ते सहभागी झाले होेते. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान जळगाव विभागाच्यावतीने या मोर्चासाठी पुढाकार घेतला.


Web Title: A rally on the District Collectorate
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.