सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील वारसा जपताहेत राजीव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 04:04 PM2018-12-17T16:04:02+5:302018-12-17T16:06:30+5:30

स्व.अनिलदादा देशमुख यांना तालुक्याच्या विकासाची चौफेर अशी दूरदृष्टी होती. तळागाळातील, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांचाच वारसा त्यांचे पुत्र राजीव देशमुख यांनी जोपासला आहे.

 Rajiv Deshmukh is living in the cultural and sports fields | सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील वारसा जपताहेत राजीव देशमुख

सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील वारसा जपताहेत राजीव देशमुख

Next
ठळक मुद्देमैत्रीपूर्ण वृत्ती, सदैव सहकार्याची तयारी, सर्वांशी आदर व आपुलकीची वागणूक ही राजीव देशमुख यांची बलस्थाने आमदारकीच्या काळात एम.आय.डी.सी. ची मुहूर्तमेढ रोवली. गिरणा धरणातून चाळीसगाव शहराला पाणी पुरवठा करणारी योजना मंजूर करुन कार्यान्वीत केली.

चाळीसगाव ( संजय सोनार) नगरपालिकेतील सलग २७ वर्षे नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे, पश्चिम विकास महामंडळाचे अध्यक्ष यांसह अनेक पदे भूषविणारे लोकनेते स्व.अनिलदादा देशमुख यांना तालुक्याच्या विकासाची चौफेर अशी दूरदृष्टी होती. तळागाळातील, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांचाच वारसा त्यांचे पुत्र राजीव देशमुख यांनी जोपासला आहे.
स्व. नगराध्यक्ष रामरावदादा यांच्या निधनानंतर नगराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांचे पुत्र अनिलदादा यांच्याकडे जनतेने सोपविली. अनिलदादांनी राजकारणात सर्वांना एकत्रित आणून आपल्या कौशल्याने नगरपालीकेत सलगपणे २७ वर्षे नगराध्यक्षपद भूषवून महाराष्ट्रात नावलौकीक मिळविला होता. कुशल, धुरंधर व मुरब्बी राजकारणी अशी त्यांच्या कार्याची ओळख. याबरोबरच त्यांनी बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन, वैधानिक महामंडळाचे संचालक, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष, आॅल इंडिया इन्स्टीट्युट आॅफ लोकल बोर्डाचे व्हा.चेअरमन, जिल्हा बँक संचालक या सह अनेक पदांवर कार्यरत होते. जातीय सलोखा कायम ठेवून चाळीसगाव शहरात शांतता प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. यामुळेच त्यांची चाळीसगाव नगरीचे शिल्पकार म्हणून ओळख होती.
अनिलदादा देशमुख यांचे २००१ मध्ये निधन झाले, त्यानंतर नगरसेवक म्हणून त्यांचे पुत्र राजीव देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राजीव देशमुख यांच्या सार्वजनिक, सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात येथून झाली. तेव्हापासून त्यांनी आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखविली. यानंतर झालेल्या न.पा. निवडणुकीतही ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले तर नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत त्यांच्या पत्नी पद्मजा देशमुख विजयी झाल्यात आणि पालिकेची सत्ता देशमुख परिवाराकडे आली.
चाळीसगाव विधानसभा मतदार संघ ४० वर्षानंतर प्रथमच खुला झाल्यानंतर राजीव देशमुख यांना आमदारकीची संधी मिळाली. आमदारकीच्या या संधीने स्व. अनिल दादांची इच्छा पूर्ण झाली. आजोबा स्व. रामरावदादा व वडील स्व. अनिलदादा यांच्या पावलावर पाऊल ठेवीत राजीव देशमुख यांनीही राजकारणाबरोबरच सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक रुची जोपासली. वडील व आजोबांनी जोपासलेला वारसा ते मोठ्या दिमाखाने पुढे नेत आहे. कुटूंबाचे समाजकारण, राजकारणातील कामांची पध्दत त्याच दिशेने त्यांनी पुढे आणली. मैत्री पूर्ण वृत्ती, हसतमुख चेहरा, सदैव सहकार्याची तयारी, सर्वांशी आदर व आपुलकीची वागणूक ही त्यांची बलस्थाने आहेत.
आमदारकीच्या काळात त्यांनी चाळीसगाव एम.आय.डी.सी. ची मुहूर्तमेढ रोवली. गिरणा धरणातून चाळीसगाव शहराला पाणी पुरवठा करणारी योजना मंजूर करुन ती कार्यान्वीत केली. वरखेडे धरणाची सुरुवात ही त्यांच्याच काळात झाली. जिद्दीने आपला राजकीय व सामाजिक प्रवास सुरु ठेवला आहे, निष्ठा व संघटनेतील जबाबदारी पार पाडत आहे.
 

Web Title:  Rajiv Deshmukh is living in the cultural and sports fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.