जळगावात प्रस्तावित रस्त्याची जागा अप्पर आयुक्तांनी परस्पर दिली हॉकर्सना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:42 PM2017-12-13T12:42:51+5:302017-12-13T12:43:11+5:30

मनपाने खटला लढून अनेक वर्षानंतर मिळवली होती जागा

The proposed road in Jalgaon was interconnected by the Additional Commissioner | जळगावात प्रस्तावित रस्त्याची जागा अप्पर आयुक्तांनी परस्पर दिली हॉकर्सना

जळगावात प्रस्तावित रस्त्याची जागा अप्पर आयुक्तांनी परस्पर दिली हॉकर्सना

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13- काव्यर}ावली चौकातील पोलीस अधीक्षक बंगल्या नजीकची जागा मोठा वाद, कोर्टातील संघर्षानंतर मनपाने ताब्यात घेतली मात्र ही जागा परिसरात व्यवसाय करणा:या 18 हॉकर्सना देण्याचा निर्णय मनपा अपर आयुक्तांनी परस्पर घेतला आहे. 
महापालिकेच्या मालकीच्या डीएसपी बंगल्याला लागून असलेल्या रस्त्याच्या जागेत पोलीस प्रशासनाचे बांधकाम होते. कर्मचा:यांचे क्वार्टर व वॉलकंपाऊंड होते. ही जागा ताब्यात मिळावी म्हणून महापालिकेला उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली होती. न्यायालयानेही पोलीस प्रशासनाला ही जागा रिकामी करून देण्याचे आदेश केले होते. त्यानंतरही जवळपास एक वर्ष ही जागा पोलीस प्रशासनाच्या ताब्यात होती. याबाबत ‘लोकमत’ ने पाठपुरावा केल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांना आदेश करून ही जागा मनपाला देण्याचे आदेश केले होते. त्यानंतर ही जागा मनपाच्या ताब्यात आली. 
रिकामी जागा हॉकर्सना
रस्त्यासाठी महत्प्रयासाने ताब्यात घेतलेल्या या जागेवर आरटीओकडील एजंट व वाहनांची जत्रा भरत होती. त्यावर आणखी कडी म्हणजे आता ही जागा परिसरात व्यवसाय करणा:या 18 हॉकर्सना देण्याचा निर्णय झाला आहे. अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी या ठिकाणी भेट देऊन ही जागा हॉकर्सना देण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी जेसीबीने सपाटीकरणाचे कामही मनपाने करून दिले. 
परस्पर निर्णय
हॉकर्सच्या पर्यायी जागांचे सर्व निर्णय मनपाच्या सभेत झालेले असताना अपर आयुक्तांनी परस्पर निर्णय कसा घेतला?  रस्त्यावरील हॉकर्स पर्यायी जागेवर हलविणे मनपाला शक्य होत नसताना रस्त्यासाठी संपादित जागेवर हॉकर्सचे स्थलांतर कशासाठी? रस्त्याचे काम करण्याऐवजी प्रशासन त्यावर अतिक्रमणाची परवानगी कशी देते? असा सवाल उपस्थित झाला आहे.
आरटीओ कार्यालयाच्या रस्त्यावर खाद्य पदार्थाच्या गाडय़ा लागत असत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. यावर उपाय म्हणून या हाकर्सना तात्पुरत्या स्वरुपात ही जागा देण्यात आली आहे. नंतर हाकर्स समितीने जागांची निश्चिती केल्यावर तेथे या हॉकर्सना हलविले जाईल. 
-राजेश कानडे, अपर आयुक्त, मनपा. 

Web Title: The proposed road in Jalgaon was interconnected by the Additional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.