हरभरा डाळीेचे भाव ८०० रुपयांनी गडगडले; ग्राहकांना दिलासा, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:05 PM2018-04-15T12:05:30+5:302018-04-15T12:05:30+5:30

प्रचंड आवक

Prices of gram palm stole Rs 800 | हरभरा डाळीेचे भाव ८०० रुपयांनी गडगडले; ग्राहकांना दिलासा, शेतकरी हवालदिल

हरभरा डाळीेचे भाव ८०० रुपयांनी गडगडले; ग्राहकांना दिलासा, शेतकरी हवालदिल

Next
ठळक मुद्देमागणी वाढली तरी भाववाढ ऐवजी घसरणहरभरा खरेदी बंदचाही परिणाम नाही

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १५ - हरभऱ्याचे उत्पादन वाढण्यासह दोन वर्षांपासून माल शिल्लक असल्याने बाजारपेठेत हरभरा डाळीचीही आवक वाढून डाळीच्या भावात ७०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकºयांच्या मालाला भाव मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. यंदा मागणी वाढली तरी डाळीमध्ये भाववाढ होण्याऐवजी घसरण झाल्याचे चित्र प्रथमच दिसून येत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. दरम्यान, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा खरेदी बंद असली तरी जिल्ह्यातील इतर भागातून माल येत असल्याने दालमिलमध्ये कच्च्या मालावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे.
रब्बी हंगाम संपून बाजारपेठेत हरभरा येत आहे. यंदा हरभºयाची मोठ्या प्रमाणात लागवड होऊन उत्पादन साधारण २५ ते ३० टक्क्याने वाढले आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत हरभºयाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात भरात भर म्हणजे दोन वर्षापासूनचा माल शेतकरी, व्यापारी, दालमिल येथे शिल्लक असल्याने सर्वत्र हरभºयाचा बफर स्टॉक असल्याचेच चित्र आहे.
डाळींचीही आवक वाढली
हरभºयाचे उत्पादन चांगले असल्याने दालमिलमध्ये पुरेसा कच्चा माल उपलब्ध होत आहे. डाळ उत्पादन अग्रेसर असलेल्या जळगावातील दालमिलमध्ये जिल्ह्यातील व्यापाºयांकडून मोठ्या प्रमाणात माल येत आहे. यामुळे डाळींचे उत्पादन वाढले आहे. या सोबतच विदर्भातील मलकापूर, अकोला, अमरावती तर मध्यप्रदेशातील इंदूर, खंडवा येथून तयार डाळही जळगाव बाजारपेठेत येत आहे.
भाव गडगडले
आवक वाढल्याने डाळीचे भाव ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटलने कमी झाले आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी ५४०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल असलेली हरभरा डाळीचे भाव आज ४७०० ते ५२०० रुपयांवर आले आहेत.
मागणीही वाढली
सध्या धान्य खरेदीचा हंगाम सुरू असून या सोबत डाळीचीही खरेदी केली जात आहे. यामध्ये हरभरा डाळीला चांगलीच मागणी आहे. असे असले तरी भाव वाढण्याऐवजी ते कमी झाल्याचे चित्र यंदा बाजारपेठेत आहे.
व्यापाºयांची द्विधा स्थिती
हरभºयाच्या बाबतीत शेतकºयांच्या पदरी निराशा असून त्यांच्या मालाला भाव नाही. यासोबतच व्यापाºयांचीही द्विधा स्थिती निर्माण झाली आहे. हमी भावात माल घेतला तर त्या तुलनेत बाजारपेठेत भाव मिळत नाही तर दुसरीकडे कमी भावाने माल खरेदी केला तर कारवाईची भीती आहे, त्यामुळे व्यापारीदेखील संकाटत सापडले आहेत.

हरभºयाची आवक चांगली असून डाळ उत्पादनही यंदा चांगले आहे. यामुळे डाळीचे भाव कमी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातून ठिकठिकाणाहून हरभºयाची आवक होत आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.

हरभºयाचे उत्पादन वाढल्याने यंदा आवक चांगली असण्यासह बाजारपेठेत तयार डाळीचीही आवक वाढली आहे. यामुळे हरभरा डाळीच्या भावात घसरण झाली आहे. डाळीला मागणीही चांगली आहे.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन.

यंदा हरभरा डाळीचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले असून इतके कमी भाव अनेक वर्षांत पाहिलेले नाही.
- अनिक कांकरिया, उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ.

Web Title: Prices of gram palm stole Rs 800

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.