जळगावात वांग्याचे दर वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 05:41 AM2018-09-14T05:41:06+5:302018-09-14T05:42:16+5:30

सणवारामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने बटाटे, वांगे यांचे भाव वधारण्यासह कोथिंबीरच्या भावात दीडपटीने वाढ झाली.

price of brinjal increased in jalgaon | जळगावात वांग्याचे दर वाढले

जळगावात वांग्याचे दर वाढले

Next

सणवारामुळे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी झाल्याने बटाटे, वांगे यांचे भाव वधारण्यासह कोथिंबीरच्या भावात दीडपटीने वाढ झाली. गेल्या आठवड्यात २००० ते ३००० रुपये प्रती क्विंटल असलेल्या कोथिंबीरचे भाव या आठवड्यात ३००० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले. हरतालिका, गणेशोत्सवामुळे शेतकऱ्यांनी शेतातून माल काढला नसल्याने आवक कमी झाली. त्यामुळे गंगाफळ, गवारच्या शेंगा, कोथिंबीर, मेथीची आवक घटून त्यांचे भाव वाढत आहे. बटाट्याच्याही भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ११०० ते १५०० रुपयांवरून १३०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहे. लिंबूच्याही भावात वाढ होऊन ते १५०० ते २००० रुपये प्रती क्विंटलवरून २५०० रुपयांवर पोहचले आहे. गणेशोत्सवात भंडाºयासाठी गंगाफळ व इतर भाज्यांना मागणी वाढणार आहे.

Web Title: price of brinjal increased in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.