सध्याची परिस्थिती राजा तुपाशी अन् जनता उपाशी - खासदार सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:49 PM2018-02-21T18:49:25+5:302018-02-21T18:53:08+5:30

शेतक-यांना कर्जमाफी नाही, बोंडअळीची भरपाई नाही, उद्योग क्षेत्रात आम्ही पिछाडीवर पडलो, कुपोषणामुळे बालमृत्यूचे वाढले आहते. एकेकाळी नंबर वन असलेले महाराष्ट्र राज्य आज सर्वच बाबतीत अडचणीत आले असल्याची अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे पत्रपरिषदेत केली.

Present situation Raja Tupasi and Janataan Hungry - MP Supriya Sule | सध्याची परिस्थिती राजा तुपाशी अन् जनता उपाशी - खासदार सुप्रिया सुळे

सध्याची परिस्थिती राजा तुपाशी अन् जनता उपाशी - खासदार सुप्रिया सुळे

googlenewsNext
ठळक मुद्देराजा तुपाशी अन् जनता उपाशीशिक्षणाचा अधिकार हिरावला जात आहेशेतकºयांसाठी नाही पण जाहिरातबाजीसाठी आहे सरकारकडे पैसा

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२१- शेतक-यांना कर्जमाफी नाही, बोंडअळीची भरपाई नाही, उद्योग क्षेत्रात आम्ही पिछाडीवर पडलो, कुपोषणामुळे बालमृत्यूचे वाढले आहते. एकेकाळी नंबर वन असलेले महाराष्ट्र राज्य आज सर्वच बाबतीत अडचणीत आले असल्याची अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे पत्रपरिषदेत केली.
राजा तुपाशी अन् जनता उपाशी
सरकारमुळे त्रस्त झालेली जनता मंत्रालयात आत्महत्या करीत असल्याने त्या रोखण्यासाठी मंत्रालयातही जाळ्या बसवाव्या लागल्या. जेथे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बसले त्या इमारतीला आज जाळी बसवावी लागले आहे. याचे वाईट वाटते आहे. महागाई आणि बेरोजगारी वाढली असून ‘राजा तुपाशी अन् जनता उपाशी' अशी आजची स्थिती असल्याची टिकाही सुळे यांनी केली.
शेतकºयांसाठी नाही पण जाहिरातबाजीसाठी आहे सरकारकडे पैसा
शेतकºयांच्य कर्जमाफीसाठी तसेच त्याच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत मात्र जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, अशी टिकाही सुप्रिया सुळे यांनी केली. ‘बेटी बचाव’ अभियानाच्या जाहिरातींसाठीही प्रचंड पैसा खर्च केला. मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट महाराष्ट्रात स्त्रीजन्म दर हा आता घटला आहे.

Web Title: Present situation Raja Tupasi and Janataan Hungry - MP Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.