जामनेरला अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुक कार्यकर्त्यांची निवडणुकीची तयारी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क on Wed, January 03, 2018 7:01pm

नगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना बुधवारी जिल्हाधिकाºयांनी जाहीर केली. नगरपालिकेने तयार केलेली रचना जैसे थे ठेवण्यात आली आहे. सर्वच हरकती आयुक्तांनी फेटाळल्यानंतर इच्छुक उमेदवार निवडणुक लढविण्याच्या कामाला लागले आहेत.

आॅनलाईन लोकमत जामनेर, दि.३ : नगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना बुधवारी जिल्हाधिकाºयांनी जाहीर केली. नगरपालिकेने तयार केलेली रचना जैसे थे ठेवण्यात आली आहे. सर्वच हरकती आयुक्तांनी फेटाळल्यानंतर इच्छुक उमेदवार निवडणुक लढविण्याच्या कामाला लागले आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुक होण्याची शक्यता आहे. अधिसुचना जाहीर होण्यापूर्वी मंजुर कामांना सुरुवात करण्याचा धडाका सुरु झाला आहे. त्याचबरोबर काही कामांचे भुमिपुजन करण्याचेही नियोजन सत्ताधारी करीत आहे. सुरु असलेल्या कामांचे श्रेय घेण्याची धडपड देखील सुरु आहे. बारा प्रभागातुन २४ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. त्यात १२ महिला, २ जागा अनुसूचित जाती, एक जागा अनुसूचित जमाती व ६ जागा ओबीसी राखीव आहेत. जाहिर झालेल्या प्रभाग रचनेतून कोणत्या भागातील किती मतदार प्रभागात आहेत हे स्पष्ट होत असल्याने उमेदवारांना आता निवडणुकीची तयारी करणे सोईचे होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने मेळावे घेवुन कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. भाजपमध्ये सध्या शांतता दिसत असतांना इच्छुकांची मात्र तयारी सुरु आहे.

संबंधित

अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी?
.२८ मार्चपर्यंत करा बँकांची कामे पूर्ण, सलग चार दिवस सुट्टी
बहिणाबाई महोत्सवातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन
जळगावात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जोरदार खरेदी
मुलगा सारखी चिडचिडच करतो

जळगाव कडून आणखी

.२८ मार्चपर्यंत करा बँकांची कामे पूर्ण, सलग चार दिवस सुट्टी
प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाने जळगावातील सात कंपन्यांना फटका
बहिणाबाई महोत्सवातून सांस्कृतिक परंपरेचे दर्शन
जळगावात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जोरदार खरेदी
गुढीपाडवा होणार गोड, आवक वाढल्याने साखरेच्या भावात घसरण

आणखी वाचा