चाळीसगावला पोस्ट कर्मचाऱ्यांची स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:58 AM2018-09-25T01:58:33+5:302018-09-25T01:59:35+5:30

तीन ट्रॅक्टर कचरा संकलन : ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ

Post employees cleanliness campaign in Chalisgaon | चाळीसगावला पोस्ट कर्मचाऱ्यांची स्वच्छता मोहीम

चाळीसगावला पोस्ट कर्मचाऱ्यांची स्वच्छता मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्देपोस्ट कर्मचारी स्वच्छता अभियानाचे टी शर्ट परिधान करुन अभियानात झाले सहभागीस्वच्छता अभियानात तीन ट्रॅक्टर कचरा झाला संकलित झालाअभियानाचे नागरिकांनी केले कौतुक

चाळीसगाव, जि.जळगाव : ‘स्वच्छता ही सेवा’ या केंद्र सरकारने आवाहन केलेल्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सोमवारी झाला. यात चाळीसगाव मुख्य पोस्टातील कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला.
नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी अभियानाला दत्त मंदिर परिसरातून सुरुवात झाली. सिग्नल चौकापर्यंतचा परिसर चकाचक करण्यात आला. अभियानाचे नागरिकांनी कौतुक केले. स्वच्छता अभियानात तीन ट्रॅक्टर कचरा संकलित झाला.
पोस्ट कर्मचारी स्वच्छता अभियानाचे टी शर्ट परिधान करुन अभियानात सहभागी झाले. या वेळी डाकघर उपअधिक्ष मनीष नवलू, पोस्टमास्तर सुनील कोळी, विश्वास चव्हाण यांच्यासह पोस्ट कर्मचारी मनोज करंकाळ, आर.के.माळी, भूषण मोरे, रमेश माळी, सुरेश बनसोडे, पालेश देशमुख आदींनी प्रत्यक्ष स्वच्छता केली.




 

Web Title: Post employees cleanliness campaign in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.