भुसावळ येथे हद्दपारीच्या आरोपीस घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 08:02 PM2018-09-22T20:02:47+5:302018-09-22T20:03:51+5:30

बाजारपेठ पोलिसांची कामगिरी

In the possession of the deportation accused in Bhusawal | भुसावळ येथे हद्दपारीच्या आरोपीस घेतले ताब्यात

भुसावळ येथे हद्दपारीच्या आरोपीस घेतले ताब्यात

Next
ठळक मुद्देआरोपीने केले हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघनबाजारपेठ पोलिसांनी घेतले ताब्यात




लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ, जि.जळगाव : हद्दपारीचे आदेश असतानाही शहरात फिरणाऱ्या अक्षय प्रकाश नावकर (वय २०, रा.गायत्री मंदिराजवळ, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले.
सण-उत्सवाच्या काळात शहरात जातीय सलोखा बाधित होऊ नये तसेच समाजाला विघातक उपद्रवींना हद्दपारीचे आदेश उपविभागीय दंडाधिकाºयांनी काढले होते. त्यातील हद्दपारीच्या आरोपींमध्ये अक्षय प्रकाश नावकर (वय २०, रा.गायत्री मंदिराजवळ, भुसावळ) याचाही समावेश होता. मात्र तो आदेशाचे उल्लंघन शहरात फिरताना आढळून आला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक रोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, तसलीम पठाण, पोलीस नाईक सुनील थोरात, पो.कॉ.कृष्णा देशमुख, विकास सातदिवे यांनी केली. गुन्ह्याचा तपास सुनील थोरात करीत आहे.


 

Web Title: In the possession of the deportation accused in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.