वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी १०० वृक्षांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 06:05 PM2019-07-20T18:05:50+5:302019-07-20T18:06:43+5:30

मुंबईतील अधिकाऱ्याने आपल्या गावी जुवार्डी येथे राबविले अभियान

Planting of 100 trees to preserve the father's memory | वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी १०० वृक्षांचे रोपण

वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी १०० वृक्षांचे रोपण

Next


आनंदा महाजन।
गुढे, ता. भडगाव : प्रियजनाचे दु:खद निधन कुठल्याही परिवारासाठी धक्कादायक असते. या दु:खातून सावरत मुंबईस्थित पोलीस उपनिरीक्षक सतीश नाना पाटील यांनी आपले गाव जुवार्डी येथे वडील नाना परशराम पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी १०० वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवला.
या अभियानासाठी सतीश पाटील यांनी ट्री गार्ड (वृक्ष संरक्षक जाळी) बनविण्यासाठी १० हजाराची देणगी दिली. अनेकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी केला.
याप्रसंगी माजी सरपंच व्ही. एस. पाटील व प्रकाश पाटील यांनी भूमिपुत्रच्या सगळ्या सदस्यांना वाढदिवस व उत्तरकार्य खर्चात बचत करून असे सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
ग्राम पंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, प्राथ. शिक्षक आर. डी. पाटील, रोहिदास पाटील, अविनाश पाटील, रमेश पाटील, जळगाव जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापक आर एस पाटील, राज मेडीकल चे गुणवंत पाटील, लिपिक रावासाहेब पाटील, डॉ. चेतन पाटील, भूषण पाटील, विद्या पाटील, मधुकर सोनवणे, भैय्या पाटील, सुनील पाटील ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.
वृक्ष लागवडीसाठी भूमिपुत्र ग्रुप, राजमुद्रा फौंडेशनचे भूषण पाटील, विश्वास अमृत पाटील, माध्यमिक व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले. वृक्ष संवर्धनाची हमी घेणाºया कुटुंबाना दोनशे ट्री गार्ड वाटप करण्यात आले. ग्राम पंचायत प्रशासन जुवार्डी तसेच सामाजिक वनीकरण विभागाने रोपे उपलब्ध करून दिली. तसेच सर्वज्ञ सेवा प्रतिष्ठान मुबईचे मधुकर सोनवणे यांनी पर्यावरण पूरक निंबाची रोपे उपलब्ध करून दिली.
अनेकांचे लाभले सहकार्य
या उपक्रमात ग्रामसेवक मुकेश चौधरी, प्रकाश शिवराम पाटील, काशिनाथ बंकट पाटील, गोपीनाथ पगारे, दिगंबर पाटील नाशिक, दत्तात्रय त्र्यंबक पाटील, प्राथ. शिक्षक विनोद पाटील , निर्मल कृषी केंद्र, चंद्रशेखर पाटील, अविनाश पाटील, जय माताजी सहजयोग परिवार, स्वाध्याय परिवार, जुवार्डी विकास मंच, मुंबई येथील डॉ. अशोक मुळगावकर, लोटस ट्रस्ट, डॉ. यशवंत तिळवे, डॉ. संजय जैन, विजयकुमार जैन, खेमानी चॅरीटेबल ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजेंद्र पाटील यांनी प्रत्येकी दहा ट्री गार्ड उपलब्ध करून दिले.

Web Title: Planting of 100 trees to preserve the father's memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.