पारोळ्यात पुजाऱ्याला मारहाण करीत मंदिरातील ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:19 AM2019-01-22T01:19:40+5:302019-01-22T01:24:21+5:30

पारोळा शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून साने गुरुजी नगरमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यानी बंद घराचा दरवाजा तोडून घरातील साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. तर शहरातील छोटे राममंदिरातील पुजाºयाला मारहाण करून चांदीचे दागिने व पैसे लंपास केल्याची घटना घडली .

 In the past, the house was stopped by the priest in the parking lot | पारोळ्यात पुजाऱ्याला मारहाण करीत मंदिरातील ऐवज लांबविला

पारोळ्यात पुजाऱ्याला मारहाण करीत मंदिरातील ऐवज लांबविला

googlenewsNext
ठळक मुद्देशालकाच्या लग्नातील सोन्यावरच चोरट्यांचा डल्लाश्वानपथकाला पाचारण, पण माग नाही

पारोळा : येथील साने गुरुजी नगरमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यानी बंद घराचा दरवाजा तोडून घरातील साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. तर शहरातील छोटे राममंदिरातील पुजाºयाला मारहाण करून चांदीचे दागिने व पैसे लंपास केल्याची घटना घडली .
शहरात गेल्या दोन दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू आहे. परवा न्यू बालाजीनगरमध्ये एका अभियंत्याचे घर चोरट्यांनी लक्ष्य केले होते. आणि त्या पाठोपाठ लगेच दुसºया दिवशी साने गुरुजी कॉलनीत हर्षल सुधाकर पाटील यांच्या बंद घराला चोरांनी लक्ष्य करीत, सहा लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. एवढेच नव्हे तर छोट्या राममंदिरातील पुजाºयाला मारहाण करून दागिने चोरून नेले. त्यामुळे पुन्हा पारोळा शहरातील खाकीचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२१ रोजी पहाटे शहरातील साने गुरुजीनगरमधील रहिवासी आणि ट्रान्सपोर्टचे मालक हर्षल सुधाकर पाटील यांच्या मामीचे निधन झाले होते. त्यामुळे ते पत्नीसह अंत्ययात्रेसाठी २० रोजी सायंकाळी सहा वाजता काळखेडा, जि. धुळे येथे घर बंद करून गेले होते. या बंद घराला लक्ष्य करीत अज्ञात चोरट्यानी मध्यरात्रीनंतर घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील बेडरूममधील कपाटातील सोन्याची पट्टी, नेकलेस, तीन गोफ, २० अंगठ्या, मंगलपोत, कानातले, टोंगल, चांदीच्या वस्तू अश्या एकूण सुमारे वीस तोळे सोने व पंच्चावन्न हजार रुपये रोख असा सहा लाख चाळीस हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. ही बाब सकाळी शेजारच्या लोकांच्या लक्षात आली असता त्यांनी हर्षल पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, सुधीर चौधरी, पंकज राठोड, सुनील साळूंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व जळगाव येथील श्वान पथक, हस्त ठसेतज्ञाना पाचारण केले होते. तथापि श्वान पथक परिसरातच घुटमळत राहिले. या प्रकरणी हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. कॉ. बापू पाटील करीत आहेत.
दरम्यान, चोºयांचे वाढते सत्र पाहता पोलिसांनी रात्रीची गस्त कडक करावी अशी मागणी शहरवासियांतर्फे केली जात आहे.

शालकाच्या लग्नातील सोन्यावरच डल्ला
हर्षल पाटील यांच्या शालकाचे लग्न जमले असून लग्नासाठी खरेदी केलेल्या सोन्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

 

Web Title:  In the past, the house was stopped by the priest in the parking lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyदरोडा