मुख्यमंत्र्याच्या सभेत पाडळसर धरण केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 05:04 AM2019-04-20T05:04:47+5:302019-04-20T05:04:50+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमळनेर येथील सभेत पाडळसे धरणाचा प्रलंबित विषयच केंद्रबिंदू राहिला.

Pansalasar center of the center in the meeting of Chief Minister | मुख्यमंत्र्याच्या सभेत पाडळसर धरण केंद्रबिंदू

मुख्यमंत्र्याच्या सभेत पाडळसर धरण केंद्रबिंदू

Next

अमळनेर/जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमळनेर येथील सभेत पाडळसे धरणाचा प्रलंबित विषयच केंद्रबिंदू राहिला. आमदार स्मिता वाघ, आमदार शिरीष चौधरी यांनी हा विषय लावून धरला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या संदर्भात नाबार्डकडे
प्रस्ताव पाठविल्याची माहिती सभेत दिली.
पाडळसरे प्रकल्पामुळे ६७ गावे सुजलाम सुफलाम होणार आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे हे काम सोपवले आहे. नाबार्डपुढे प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले. पाडळसरे प्रकल्पासाठी निधीसंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची जळगावलाही सभा झाली. त्यात माजी मंत्री सुरेशदादा म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात या देशाची मोठी प्रगती झाली. ७० वर्षांत झाले नाही ते पाच वर्षांत झाले. जळगाव शहरात अमृत योजनेचे काम सुरू झाले असून भविष्यात भुयारी गटारींसह विविध विकास कामे प्रस्तावित असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

Web Title: Pansalasar center of the center in the meeting of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.