घरकूल अपहार प्रकरणी चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:03 AM2019-02-21T00:03:49+5:302019-02-21T00:03:59+5:30

लाभार्थ्यांना न्यायाची अपेक्षा

 Order of inquiry in the house of abduction | घरकूल अपहार प्रकरणी चौकशीचे आदेश

घरकूल अपहार प्रकरणी चौकशीचे आदेश

Next

बिडगाव, ता. चोपडा : येथून जवळच असलेल्या वरगव्हाण शेवरे ग्रुप ग्रामपंचायतच्या शेवरे येथील आदिवासी घरकूल लाभार्थींच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांची रक्कम परस्पर काढल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश चोपडा पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी बी.एस.कोसोदे यांनी दिले आहेत. त्यात ‘लोकमत’च्या वृत्ताचा संदर्भ देत प्रकाशित बातमीचाही उल्लेख केला आहे.
शेवरे बु.येथील आदिवासी बांधवांना २००५ ते २०१८ या कालावधीत शासनाने इंदिरा गांधी घरकूल योजना, राजीव गांधी आवास योजना, शबरी घरकूल योजना, पंतप्रधान आवास योजना या योजनांमधून घरकुले मंजुर झाली होती. त्यासाठी २५ ते ३० लाखांचा निधी खर्चही केला आहे. मात्र तरीही गावात आज मितीस एकही घरकुल पूर्ण झाले नाही हे विशेष. बहुतेक लाभार्थ्यांना नाममात्र रक्कम देऊन त्यांच्या नावाने पूर्ण रक्कम काढून अपहार झाल्याच्या तक्रारी आहेत. एवढे नव्हे तर काही लाभार्थींचे गावात अस्तीत्वच नसताना त्यांचे नावे आलेल्या घरकुलांचा पायाही न खोदता परस्सर निधी हडप केल्याची तक्रार दीपक पाटील यांनी केली होती.
या संदर्भात ‘लोकमत’मध्ये ‘आदिवासींच्या घरकूल निधीवर डल्ला’ या मथळ््याखाली वृत्त १० फेब्रुवारी रोजी प्रकाशित केले व ही सत्यता बाहेर आणली होती. एवढा मोठा गलथान कारभार हा सरपंच, ग्रामसेवक व शाखा अभियंत्यांच्या मिलीभगत शिवाय होऊच शकत नसल्याने प्रशासनाचीही दिशाभूल झाली असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे.
या अपहारप्रकरणी ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. या प्रकारणाची चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कोसोदे यांनी दखल घेत सदरील प्रकरणाची चौकशी आदेश काढून त्यात म्हटले आहे की, ‘लोकमत’ला ‘आदिवासींच्या घरकूल निधीवर डल्ला’ असे वृत्त १० फेब्रुवारी रोजी प्रकाशित केले होते. त्याअनुषंगाने प्रत्यक्ष वरगव्हान गावी जाऊन घरकुल प्रकरणी कागद पत्रांची पडताळणी करून वस्तुनिष्ठ चौकशी करून अहवाल सादर करावे अशा आदेशाचे पत्र सहाय्यक गटविकास अधिकारी एस.बी.कोळी व शाखा अभियंता डी.आर.डोके यांची चौकशीसाठी नेमणूक करून दिले आहेत. यामुळे शासनाने लाभ देऊनही त्या निधीत अपहार करत लाभापासून वंचीत असलेल्या आदिवासी बांधवांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘लोकमत’ने हा विषय लावून धरल्याने लोकमतचे आभारही व्यक्त केले जात आहेत.

घरकूल निधीच्या अपहार प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेऊन दोन अधिकाºयांची चौकशीसाठी नेमणूक केली आहे. त्याबाबतचा अहवाल येताच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
- बी.एस. कोसोदे, गटविकास अधिकारी, पं.स.चोपडा

Web Title:  Order of inquiry in the house of abduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव