हरभरा नोंदणीच्या मुहूर्ताला ‘आॅनलाईन’ सातबारा उताऱ्याचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 07:21 PM2019-03-20T19:21:32+5:302019-03-20T19:23:11+5:30

केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीत सुरू होणाºया हरभरा खरेदीसाठी राज्य सरकारने अशा खरेदी केंद्रावर नाव नोंदणीसाठी हस्तलिखित नव्हे तर आॅनलाईन सातबारा उतारा सक्तीचा केला आहे. दुसरीकडे मात्र यासाठी लागणारे डीएससी मशीनच जिल्हाभरातील तलाठ्यांनी दोन दिवसांपूर्र्वी तहसील कार्यालयात जमा केल्याने शेतकरी कात्रीत सापडला आहे.

The online breakdown of the online registration of the gram registration | हरभरा नोंदणीच्या मुहूर्ताला ‘आॅनलाईन’ सातबारा उताऱ्याचा ब्रेक

हरभरा नोंदणीच्या मुहूर्ताला ‘आॅनलाईन’ सातबारा उताऱ्याचा ब्रेक

googlenewsNext
ठळक मुद्देतलाठ्यांची डीएससी मशीन वापसी अर्ध्या-एक तासाने निघतो एक दाखला अन् विलंबाने होतात नोंदीशेतकऱ्यांचा रोष होतोय ‘अप्पां’वरही

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीत सुरू होणाºया हरभरा खरेदीसाठी राज्य सरकारने अशा खरेदी केंद्रावर नाव नोंदणीसाठी हस्तलिखित नव्हे तर आॅनलाईन सातबारा उतारा सक्तीचा केला (तसा जी.आर.च असल्याचे सांगितले जाते.) आहे. दुसरीकडे मात्र यासाठी लागणारे डीएससी मशीनच जिल्हाभरातील तलाठ्यांनी दोन दिवसांपूर्र्वी तहसील कार्यालयात जमा केल्याने शेतकरी कात्रीत सापडला आहे. अगोदरच एक महिना उशिराने हरभरा खरेदी प्रक्रिया शासनाने सुरू केली असून, त्यात आता आॅनलाईन सातबारा उताºयावाचून शेतकऱ्यांचे काम अडले आहे. पुन्हा नोंदणी, प्रत्यक्ष हरभरा मोजणी व शेतकºयांना पैसे मिळण्यात विलंब होणार आहे. तेदेखील ऐन दुष्काळात मोठ्या कष्टाने हरभरा काढूनही हे भोग शेतकºयांच्या वाट्याला आले आहेत.
आॅनलाईनचा फज्जा
दोनच दिवसांपूर्वी तालुक्यावरील खरेदी-विक्री संघाकडे अशी हरभरा खरेदी प्रक्रिया म्हणून उत्पादक शेतकºयांची नावनोंदणी सुरू झाली. मात्र त्यासाठी बात्सर व खेडगाव येथील शेतकºयांनी तलाठ्याकडे सात-बारा उतारा मागणी केली. तेव्हा यासाठी लागणारे डीसीएस हे उपकरण तहसील कार्यालयाकडे जमा केल्याचे सांगण्यात आले व यातील काही शेतकºयांनी आधीच काढून ठेवलेल्या आॅनलाईन सातबारा उताºयावर तलाठ्यांनी हस्ताक्षराने पीकपेºयात हरभरा नोंद केली. मात्र पाचोरा येथील हरभरा खरेदी केंद्रावर हे सातबारा स्वीकारले नाहीत. त्यामुळे नोंदणी न करता शेतकºयांना परत यावे लागले. सेतू सुविधा केंद्राकडून सातबारा उतारा काढला तरी त्यावर रब्बीचा पीकपेरा नसल्याने तो तलाठी यांच्याकडूनच लावून घ्यावा लागणार असल्याने पुन्हा तो आॅनलाईन नसल्याने उतारा हरभरा खरेदीच्या नाव नोंदणीसाठी ग्राह्य धरीत नसल्याने खरी अडचण आहे. निदान आॅनलाईनचा असा घोळ सुरू असताना प्रशासनाने असे हस्तलिखित सातबारे उतारे खरेदी केंद्रांना स्वीकारण्याच्या सूचना, आदेश करावेत, अशी शेतकºयांची मागणी आहे.
प्रांताधिकाºयांचाही प्रतिसाद नाही
काही शेतकºयांनी योगायोगाने भडगाव येथे आलेल्या प्रांताधिकारी कचरे यांच्याकडे ही व्यथा मांडली. तेव्हा त्यांनी पाहू, मार्ग काढू अशी असमर्थता दाखविली तर एका महसूल अधिकाºयाने हरभरा खरेदी केंद्रावर काय विकता? बाहेर मार्केटला विका, असा फुकटाचा सल्ला दिला.
काय आहे तलाठी अप्पांचे आॅनलाईन दुखणे?
यासंदर्भात भडगाव महसुलातील एका तलाठ्याने सांगितले की, जिल्हाभरातील तलाठ्यांंनी आपले डीएससी हे आॅनलाईन कामासाठी लागणारे उपकरण त्या-त्या तहसीलमध्ये जमा केले आहे. यामागील कारण म्हणजे सर्व्हर स्लो चालत असल्याने एका-एका शेतकºयाला आॅनलाईन सातबारा उतारा द्यावयाचा म्हणजे अर्धा-एक तासाचा अवधी लागतो. तीच अडचण शेतीसाठीच्या विविध नोंदी करताना येत असल्याने संबंधित शेतकºयांचा रोष तलाठ्यांवर होतो म्हणूनच सोमवारपासून आॅनलाईन कामासाठी आवश्यक डीएससी (डीजीटल सिस्टीम कंट्रोल) हे लॅपटॉपला जोडण्यात येणारे उपकरणच तहसीलकडे जमा केले आहे. एकप्रकारे आॅनलाईनच्या वेळकाढूपणाला कंटाळून त्यांनी असहकार पुकारला आहे. जोपावेतो सर्व्हरवर काम जलद होत नाही तोवर अॉनलाइन काम बंद राहणार असल्याचे कळते.

Web Title: The online breakdown of the online registration of the gram registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.