अगं अगं म्हशी, सांग कोठे जाशी, जामनेरात पुराण बोधकथेचा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:08 AM2019-02-25T00:08:57+5:302019-02-25T00:09:15+5:30

पोलिसांनी सोडविले कोढे

Oh, yes, buzz, tell where to go, the suffix of mythological story in Jamnar | अगं अगं म्हशी, सांग कोठे जाशी, जामनेरात पुराण बोधकथेचा प्रत्यय

अगं अगं म्हशी, सांग कोठे जाशी, जामनेरात पुराण बोधकथेचा प्रत्यय

Next

जामनेर : सव्वा वर्षापूर्वी हरविलेली म्हैस संबंधित मालकाला गावातच दिसल्याने ती आपली असल्याचे व सध्या ज्याच्याकडे ही म्हैस आहे, तोदेखील सदर म्हैस आपली असल्याचा दावा करू लागला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचते व ही म्हैस कोणाची? असा पेच पोलिसांपुढे पडतो. अशा कथानक वाटणाऱ्या या घटनेत जामनेर पोलिसांनी चातुर्य दाखवित आवाजावरून सदर म्हैस ज्याच्याकडे गेली, त्या मालकाकडे ती सोपविली.
येथील कुंदन विलास सुरवाडे (रा. भिमनगर, जामनेर) यांच्या मालकिची मोहरा जातीची म्हैस १८ नोव्हेंबर २०१७ रोजी हरविली होती. याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली. मध्यंतरी त्यांना याच वर्णनाची म्हैस गोकूळ कडू पिसे (रा.दामले प्लॉट, जामनेर) यांच्याकडे आढळून आली. त्या वेळी त्यांनी आपली हरविलेली म्हैस दामले प्लॉट मध्ये असल्याचा दावा करीत परत मिळवून देण्याची मागणी केली.
पोलिसांनी दामले प्लॉट मधून म्हैस पोलीस ठाण्यात आणली व सुरवाडे व पिसे दोघांना साक्षीदारांसह बोलाविले. दोघेही म्हैस आपलीच असल्याचे सांगत असल्याने पोलिसांसमोर पेच उभा राहीला. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी एक अनोखी शक्कल लढविली. त्या म्हशीला एका कोºयात उभे केले व विरुध्द दिशेला पिसे व सुरवाडे यांना उभे केले आणि म्हशीला आवाज द्यायला सांगितले. आवाज दिल्यावर म्हैस ज्याच्याकडे जाईल तोच खरा मालक त्यानुसार दोघांनी दिलेल्या आवाजानंतर म्हैस पिसे यांच्यामागे येत त्यांच्याजवळ येऊन थांबली. अखेर पोलिसांनी ही म्हैस पिसे यांना सोपविली.
पुराण कथेची आठवण
जामनेरातील या घटनेने मात्र गावात असलेल्या एका गायीचे दोन मालक पुढे येतात आणि राजासमोर पेच पडल्याने ज्याचा आवाज ऐकून गाय ज्याच्याकडे जाईल, त्याच्याकडे ती गाय सोपविली जाईल, या पुराण काळातील शक्कलचा प्रत्यय रविवारी जामनेर येथे आला व पोलिसांच्या चातुर्याचेही दर्शन त्यातून घडले. येथे केवळ गायी ऐवजी म्हशीचे दोन मालक दावा करू लागल्याने आवाजावरून म्हैस ज्याच्याकडे गेली त्याला ती सोपविण्यात आली.
आधीच कमी मनुष्यबळ असलेल्या जामनेर पोलिसांपुढे चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधाचे आव्हाण असताना सव्वा वर्षापूर्वी हरविलेल्या म्हशीच्या मूळ मालकाला शोधण्याचे कसब पार पाडावे लागले.
दरम्यान, यानंतरदेखील म्हशीच्या मालकी हक्काबाबत कुणाकडे काही पुरावे असतील तर ते दोन दिवसात सादर करण्याचे पोलिसांनी सांगितले. निरीक्षक प्रताप इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर पाटील तपास करीत आहे.

Web Title: Oh, yes, buzz, tell where to go, the suffix of mythological story in Jamnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव