बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल याने ब-हाणपूर आश्रमातून काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 05:26 PM2018-12-06T17:26:12+5:302018-12-06T17:29:29+5:30

कोथळी ता. मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बाल शौर्य नीलेश भिल याने बºहाणपूर येथील श्रीराम गोकुळ आश्रम येथून मंगळवारी पहाटे पळ काढला आहे.

Nilesh Bhill received the Bal Shaurya Puraskar award from B-Hanpur Ashram | बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल याने ब-हाणपूर आश्रमातून काढला पळ

बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल याने ब-हाणपूर आश्रमातून काढला पळ

googlenewsNext
ठळक मुद्देबºहाणपूर येथील श्रीराम गोकुळ आश्रमात होता वास्तव्यालावॉचमनची नजर चुकवून काढला आश्रमातून पळनीलेशची पळून जाण्याची दुसरी घटना

मुक्ताईनगर : कोथळी ता. मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय बाल शौर्य नीलेश भिल याने बºहाणपूर येथील श्रीराम गोकुळ आश्रम येथून मंगळवारी पहाटे पळ काढला आहे. पळून जाण्याची ही त्याची दुसरी घटना आहे.
नीलेश भिल्ल २०१७ मध्ये घरातून पळून गेला होता. तो परतल्या नंतर त्यास शैक्षणिक पुनर्वसनासाठी या आश्रमात दाखल करण्यात आले होते. तेथून ही तो बेपत्ता झाला आहे. बुधवारी त्याच्या आईने दिलेल्या खबरीवरून बºहाणपूर पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे अंघोळ करण्यास जातो असे सांगून वॉचमनची नजर चुकवून त्याने आश्रमातून पळ काढला.
कोथळी येथील संत मुक्ताई मंदीरावर बॅक वॉटर वरील घाटावर बुडणाऱ्या ११ वर्षीय मुलाचे प्राण वाचविल्याची दखल घेत केंद्र सरकारनच्या राष्ट्रीय बालशौर्य २०१५ या पुरस्काराने त्याला सन्मानित केले होते. २६ जानेवारी २०१६ रोजी त्याला दिल्ली येथे समारंभात पंतप्रधान यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
१६ मे २०१७ रोजी नीलेशने घर सोडुन पळ काढला होता. नऊ महीने तो बाहेर होता. तो गोरखपूर येथील सुसज्ज वसतिगृहात आश्रयास होता. येथे त्याने कधी स्वत:ची व घरची ओळख दिली नाही. आधार कार्डच्या आधारे त्याची ८ फेब्रुवारी २०१८ रोजी ओळख पटली होती.

Web Title: Nilesh Bhill received the Bal Shaurya Puraskar award from B-Hanpur Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.