वरणगावात नवीन एलईडीचा करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 03:46 PM2018-09-05T15:46:41+5:302018-09-05T15:47:30+5:30

पालिकेचे अडीच कोटी रुपये वाचणार

New LED contract in Varanagar | वरणगावात नवीन एलईडीचा करार

वरणगावात नवीन एलईडीचा करार

Next

वरणगाव, जि.जळगाव : ५० हजार लोकसंख्या असलेल्या वरणगाव शहरात नवीन एलईडी दिवे बसविण्यासाठी करार करण्यात आला असून, याद्वारे पालिकेचे वर्षाला अडीच कोटी रुपये वीज बिलापोटी वाचणार आहेत.
जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मंत्रालयात वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे व नगरसेविका मेहनाजबी इरफान पिंजारी, इईसीएलचे राज्याचे व्यास्थापकीय संचालक दीपक कोकाटे, उपसंचालक अमित चोपडे, समाजसेवक इरफान पिंजारी, कार्यालय अधीक्षक गंभीर कोळी, कुंदन माळी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून इइएसएल या कंपनीसोबत संपूर्ण शहरामध्ये १५०० वीज खांब व १५० एलइडी लाईट बसवण्याचा महत्वपूर्ण करार करण्यात आला. एकूण एलईडचा करार ६६ लाख ६० हजार ८२२ रुपयेप्रमाणे एकूण सात वर्षासाठीचा करार असणार आहे. प्रत्येक वर्षी ९ लाख रुपये वीज बिल भरावे लागणार आहे व सात वर्ष ईइएसएल कंपनी देखभाल दरूस्ती करणार आहे.
वरणगाव पालिकेला महिन्याला साडेतीन ते चार लाख वीजेचे बिल भरावे लागल होते तर वर्षाला वीज बिलापोटी ५० लाखाचा बोजा पडत होता. आता नवीन एलईडीचा कराराने वर्षाला फक्त नऊ लाखाप्रमाणे सात वर्षाला ६६ लाख ६० हजार रुपये वीज बिल नगरपालिकेला भरावे लागणार आहे. या नवीन करारामुळे वरणगाव नगरपालिकेचे दोन कोटी ३९ लाख ४० हजार रुपये वाचणार आह. कामाला तत्काळ सुरूवात करून दजेर्दार एलईडी लाईट वरणगाव शहरात बसवण्याचे आदेश याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्तिथ राज्याचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कोकाटे व अधिकाऱ्यांना दिले. नवीन एलईडी लाईटमुळे संपूर्ण वरणगाव आता प्रकाशमय होणार असून, एक विकासाची मुहूर्तमेढ रोवली असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.

Web Title: New LED contract in Varanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.