राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत ‘ईव्हीएम’वरच खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:30 PM2019-06-01T12:30:40+5:302019-06-01T12:31:23+5:30

पुढील निवडणुका मतपत्रिकेवरच घ्या अथवा निवडणुकाच न घेण्याची मागणी करणारा ठराव

At NCP's think-tank meeting on 'EVM' | राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत ‘ईव्हीएम’वरच खापर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत ‘ईव्हीएम’वरच खापर

Next

जळगाव : जळगाव मतदारसंघात गुलाबराव देवकर यांचा झालेला पराभव हा इव्हीएमचा घोळ असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला़ गिरीश महाजन हे छातीठोकपणे विजयाचे आकडे कसे सांगू शकतात? असा सवाल उपस्थित करून आगामी निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्या, अन्यथा निवडणुकाच घेऊ नका, अशा मागणीचा ठराव या बैठकीत करण्यात आला़ अनेक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली़
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता झाली़ जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले़ अनेक ठिकाहून ईव्हीएमच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत़ आम्ही जेव्हा स्थानिक पातळीवर फिरतो तेव्हा शेतकरी वर्ग सांगतो आम्ही मतदान केलेले नाही, लोक सांगतात आम्ही मतदान केलेले नाही़ पहिल्या फेरीपासून गुलाबराव देवकर यांंना २५ ते २७ टक्के तर उन्मेश पाटील यांना ६४ ते ६६ टक्के हाच आकडा शेवटपर्यंत कायम कसा? किमान देवकरांच्या मतदारसंघात तरी फरक जाणवला असता़ त्यामुळे हा पराभव पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मान्य नाही. मात्र आपल्याकडे पुरावा नसल्याने आपण काही करू शकत नाही, त्यामुळे हे सर्व विसरून आता विधानसभेच्या कामाला लागावे, कार्यकर्त्यांनी निराश न होता, संघटना बळकटीकरणावर भर द्यावा, असे आवाहन रवींद्र पाटील यांनी केले़ कामे न करणाऱ्यांना पदे खाली करावी लागतील तसेच निवडणुकीसाठी नवीन कार्यकारिणी असेल, असे त्यांनी सांगितले़ दरम्यान, यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना पाटील यांनी इव्हीएमला विरोध करणारा ठराव मांडला़
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा गिरीश महाजनांपेक्षा नक्कीच अभ्यास जास्त आहे, मात्र, आजपर्यंत त्यांनी कधीच जागांच्या बाबतीत सांगितले नाही, मतमोजणीच्या काही तासांपूर्वी गिरीश महाजन यांनी अगदी छातीठोकपणे थोडावेळ थांबा भाजपच्या ४२ तर राष्ट्रवादीच्या ५ ते ६ जागा येतील, असे सांगितले होते़
ते अस कस काय सांगू शकतात़, त्यामुळे निवडणुका बॅलेटपेपरवरच घ्याव्यात, अशी मागणी पदाधिकाºयांमधून झाली़ अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष गफफार मलिक हे होते़ माजी आमदार दिलीप सोनवणे, वाल्मिक पाटील, ज्ञानेश्वर महाजन, शीतल साळी, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला महानगराध्यक्षा निला चौधरी, माधुरी पाटील, उज्ज्वल पाटील, अरविंद मानकरी, रिझवान खाटीक, नईम खाटीक, अक्षय चौधरी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती़
भाजपच्या एका बड्या नेत्याचा फोन आला़ आम्ही आमच्या गाड्या जळगाव मतदारसंघात फिरवतो, तुम्ही फक्त रावेरमध्ये आम्हाला मदत करा़, असे असताना जळगाव मतदारसंघात उलटा निकाल कसा लागला? हे दुसर काही नसून हा ‘इव्हीएम’चाच घोळ आहे, असा गौप्यस्फोट एका पदाधिकाºयांनी या सभेत केला़ त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या़
जळगावच्या मास्टरमार्इंंडची चौकशी व्हावी
निवडणूक आयोगाने इव्हीएम विरोधातील तक्रारींची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, यात जळगावचा मास्टरमार्इंड असून त्याच्याकडेही लक्ष देऊन चौकशी करावी, असाही सूर या बैठकीत पदाधिकाºयांकडून उमटला़ दरम्यान, ईव्हीएमला विरोध करण एकाबाजूने ठिक असले तरी आपण संघटनेकडे लक्ष देणे अधिक गरजेचे असल्याचे अभिषेक पाटील म्हणाले़ २१ पक्ष या विरोधात न्यायालयात गेले होते़ संघटनेत कमी पडलो हे मान्य केले तरच पुढील निवडणुकांसाठी चांगले राहिल, असेही ते म्हणाले़ दरम्यान, नेते हे कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत, कार्यकर्ते अनेक वर्ष कुठल्याही स्वार्थाशिवाय झटत असतात, मात्र, एकदा का समोरील पक्षाच्याविरोधात वातावरण निर्माण झाले की आपण आता सत्ताधारीच झालो अशा भूमिकेत नेते राहतात, असे न करता कार्यकर्त्यांकडे लक्ष देऊन नेत्यांनी मदत करावी, अशी अपेक्षा जामनेरच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली़
राष्ट्रवादीत सर्वच नेते कार्यकर्ते नाही
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्वजण नेते होत चालले आहेत़ कार्यकर्तेच शिल्लक नसल्याचे मुक्ताईनगरचे यु़डी़ पाटील म्हणाले़ कार्यकर्त्यांना जबादारी द्यावी, बूध कमिट्या मजबूत कराव्यात. एक बुथ १० यूथ ही संकल्पना राबवित असताना त्या युवकांनाच आपण समितीत आहोत हे माहित नसते़ जिल्हाध्यक्षांनी स्वत: मनावर घ्यावे, असेही ते म्हणाले़ ईव्हीएमविरोधात गावागावातून मोर्चे निघायला हवेत, असेही त्यांनी सांगितले़

Web Title: At NCP's think-tank meeting on 'EVM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव