नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार समाज परिवर्तन करणारे : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 7:50pm

धरणगाव नगरपालिका व पंचायत समिती सभागृहात प्रतिमा अनावरण

आॅनलाईन लोकमत धरणगाव, दि.१० : सद्गुरु यांचे विचार व संस्कार हे जीवनात परिवर्तन घडवून आणतात. त्यांच्या विचारांनी जगण्याला दिशा प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी धरणगाव येथे केले. धरणगाव नगरपालिका व पंचायत समिती सभागृहात प्रतिमा अनावरणाचा कार्यक्रम झाला. प्रमोद मुळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रमोद लोखंडे, संजय विसपुते, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, सचिन पवार, रामभाऊ पाटील यांनी समर्थ सेवकांच्या निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव केला. प्रतिमा अनावरण प्रसंगी व व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील, नगराध्यक्ष सलीम पटेल, सुरेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, प्रमोद पाटील, सचिन पवार, प्रेमराज पाटील, सुरेखा महाजन, मुकुंद नन्नवरे, बीडीओ सुभाष जाधव, पोलीस निरीक्षक बी.डी.सोनवणे, कैलास माळी, पप्पू भावे, सुनील चौधरी, वासुदेव चौधरी, अंजली विसावे, आराधना पाटील, पार्वताबाई पाटील, कल्पना महाजन, मंदा धनगर, भागवत चौधरी, उषा वाघ, संगीता मराठे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रामभाऊ घोळ, प्रमोद मुळे, संजय विसपुते, मोहन पाटील, विनोद माळी, प्रमोद पाटील, वृंदा तिल्हेकर, विकास पाटील, विजय माळी, प्रमोद लोखंडे, रामकृष्ण, पाटील, मनोज तायडे, प्रवीण पाटील, रेखा लोखंडे, शोभा बेंडाळे, छाया पाटील, चित्रा सोनार, कविता पाटील, शीतल मराठे, शोभा मराठे यांनी परीश्रम घेतले.सूत्रसंचलन विवेक चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन विश्वनाथ पाटील यांनी केले. मुस्लीम धर्माच्या नगराध्यक्षांचे धर्मनिरपेक्ष कार्य .. प.पू.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमा न.पा.सभागृहात लावण्याची चर्चा नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्याशी केली असता त्यांनी कोणतीही आडकाठी न घेता लगेच कार्यक्रम घडवून आणल्याचे कौतुक मंत्री गुलाबराव पाटील, गुलाबराव वाघ यांनी करीत मुस्लीम धर्मीय नगराध्यक्षांची धर्मनिरपेक्षता वाखाणण्याजोगी असल्याचे स्पष्ट केले. राजकारणी लबाड पण.... मंत्री गुलाबराव पाटील यांनी आम्ही सर्व राजकारणी लबाड असतो पण, माझे स्विय सहाय्यक विश्वनाथ पाटील यांनी मला सद्गुरुंचा सत्मार्ग दाखविला. मला रेवदंडा येथील आश्रमात घेवून जावून प.पू.नानासाहेबांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. पुढील आयुष्यात राजकारणातही सद्गुरुंच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित

जळगाव जिल्ह्यातील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या
परतीच्या पावसाने जळगावात दाणादाण, अनेक ठिकाणी उन्मळले वृक्ष
जळगावात पर्यवेक्षकाने केली विद्यार्थिनीला मारहाण
जिल्हा युवक कॉँग्रेसची आदर्श निवडणूक प्रक्रिया
भुसावळ येथे बोगी व शुध्द जलनिर्मिती प्रकल्पांचा प्रस्ताव

जळगाव कडून आणखी

जळगाव जिल्ह्यातील दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या
परतीच्या पावसाने जळगावात दाणादाण, अनेक ठिकाणी उन्मळले वृक्ष
जळगावात पर्यवेक्षकाने केली विद्यार्थिनीला मारहाण
जिल्हा युवक कॉँग्रेसची आदर्श निवडणूक प्रक्रिया
भुसावळ येथे बोगी व शुध्द जलनिर्मिती प्रकल्पांचा प्रस्ताव

आणखी वाचा