अमळनेर येथे चौकाला संत नरहरी सोनार चौक नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 04:44 PM2018-08-26T16:44:27+5:302018-08-26T16:45:10+5:30

शहरातून निघाली सवाद्य पालखी मिरवणूक

Naming the Chaukala Sant Narhar Sonar Chowk at Amalner | अमळनेर येथे चौकाला संत नरहरी सोनार चौक नामकरण

अमळनेर येथे चौकाला संत नरहरी सोनार चौक नामकरण

Next

अमळनेर, जि.जळगाव : येथील दगडी दरवाजा ते वाडी चौक मार्गाचे तसेच सराफ बाजारातील वसुंंधरा साडी सेंटरजवळील चौकाला संत शिरोमणी नरहरी महाराज असे नामकरण व पालखी मिरवणूक सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.
आमदार स्मिता वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चौकाचे नामकरण माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते, तर मार्गाचे नामकरण नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या हस्ते झाले.
प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष बिरजू लांबोळे, न. पा सभापती मनोज पाटील, भाजपा शहराध्यक्ष शीतल देशमुख, विक्रांत पाटील, साखरलाल महाजन, नगरसेवक निशांत अग्रवाल, बबली पाठक, माजी प्राचार्य डॉ.अ.गो.सराफ, मुकुंद विसपुते, मदन अहिरराव, योगेश पांडव, रामदास निकुंभ, प्रा.बहुगुणे, मनोज भामरे, प्रकाश विसपुते, मिलिंद भामरे, वाल्मीक देवरे, नगरसेवक आदी समाजातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांना संत नरहरी महाराजांची मूर्ती देवून सन्मानित करण्यात आले. सत्कार अहिर सुवर्णकार युनियनचे उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार, मधुमती भामरे, वानखेडे संस्थेचे सचिव नीलेश देवपूरकर विश्वस्त मनीष विसपुते, मोहन भामरे, राजू दाभाडे, सुनील वडनेरे, आनंद दुसाने, बाळासाहेब दुसाने, कैलास विसपुते, राजू दुसाने संजय विसपुते आदींच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संदीप सराफ यांनी केले.
या वेळी वाडी मंदिरात राजेंद्र पोतदार, भारती पोतदार यांच्या हस्ते महाराजांच्या पादुकांचे व पालखीचे पूजन करण्यात आले. पालखीची सवाद्य मिरवणूक वाडी चौकातून खिडकी सराफ, बाजार दगडी दरवाजा मार्गे कोंबडी बाजारातून भागवत रोडवरील अहिर सुवर्णकार समाज मंगल कार्यालयात सांगता झाली.
मिरवणुकीत महिला मंडळ, लेझीम, अश्वारूढ तरूणी, भजनी मंडळ सहभागी होते. महिलांची विशेष उपस्थिती होती.
या वेळी माधवराव थोरात, मधुकर दुसाने, अमृत भामरे, विजय भामरे, योगेश रणधीर, तैतील सोनार, हर्षल विसपुते, अभय सराफ, योगेश घोडके, भैया भामरे, जयेश वानखेडे, दिलीप दाभाडे, प्रमोद भामरे, गणेश खरोटे, प्रमोद वाघ, भटू सोनार, राकेश भामरे, लक्ष्मीकांत सोनार, पिंटू विसपुते, मुकेश भामरे, तुषार सोनार आदी सुवर्णकार समाजातील बांधव उपस्थित होते.
शहराची रचना यापूर्वी दगडी दरवाजाच्या आतच होती. त्यामुळे या भागाला सुमारे १२५ वर्षांचा इतिहास आहे. पालिकेने याबाबत रितसर २३ आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेत १९ क्रमांकाचा विषय घेऊन सर्वानुमते मंजूर करून तशा ठरावाची प्रत सुवर्णकार समाजाच्या पदाधिकाऱ्यांना नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी दिली. त्यानुसार दगडी दरवाजा ते वाडी मंदिरापर्यंत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज मार्ग व चौकाचे नामकरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी अहिर सुवर्णकार युनियन, सुवर्णकार महिला मंडळ, लाड, वैश्य, श्रीमाळी समाज, दि सोनार सराफ असोशियन पदाधिकारी, सर्व सुवर्णकार समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Web Title: Naming the Chaukala Sant Narhar Sonar Chowk at Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.