भुसावळ शहरात रंगला मुशायरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:58 AM2018-10-30T00:58:28+5:302018-10-30T00:59:04+5:30

अनीक फाऊंडेशन आणि खान्देश उर्दू रायटर्स यांच्यातर्फे ‘रगो मे खून न होता तो मर गये होते’ आणि ‘वक्त क्यूं शाम का आंखो मे ठहर जाता है’ या अंत्य यमकावर आधारीत गझल सादरीकरणाचा कार्यक्रम खडका चौफुलीवर पार पडला.

Mushayra ranges in the city of Bhusawal | भुसावळ शहरात रंगला मुशायरा

भुसावळ शहरात रंगला मुशायरा

Next
ठळक मुद्देजग कितीही झपाट्याने बदलत असले तरी साहित्य निर्मिती प्रक्रियेत पारंपरिक मापदंडांना महत्वाचे स्थान आहे त्यांना सोडून दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकत नाहीखान्देशच्या शायरांनी उर्दू साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल झाला उहापोह

भुसावळ, जि.जळगाव : अनीक फाऊंडेशन आणि खान्देश उर्दू रायटर्स यांच्यातर्फे ‘रगो मे खून न होता तो मर गये होते’ आणि ‘वक्त क्यूं शाम का आंखो मे ठहर जाता है’ या अंत्य यमकावर आधारीत गझल सादरीकरणाचा कार्यक्रम खडका चौफुलीवर पार पडला.
हाफिज मुश्ताक साहिल यांच्या कुराण पठणाने आणि रईस फैजपुरी यांच्या प्रेषित स्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुप्रसिद्ध लघुकथाकावर अहमद कलीम फैजपुरी अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी खान्देश उर्दू रायटर्स फाऊंडेशनचे संस्थापक, लघुकथा लेखक आणि माजी प्राचार्य सगीर अहमद यांनी प्रास्ताविक केले. आकाशवाणीचे जावेद अन्सारी यांनी भावी कृती योजनांबद्दल माहिती दिली. कविवर्य रईस फैजपुरी, शकील हसरत, शाहीर नुसरत, साईद जिलानी, हाफिज मीनानगरी, रहीम राजा, काझी रफीक राही, शकील अंजूम मीनानगरी, अखलाक निजामी, वकार सिद्दीकी, हाफिज मुश्ताक साहिल, इकबाल असर, रफीक पटवे आणि इशराक रावेरी यांनी संयोजकांनी दिलेल्या अंत्ययमकावर आधारीत आपापल्या गझला सादर केल्या.
डॉ.गयास उसमानी यांनी उर्दू भाषेच्या लोकप्रियतेबद्दल विचार प्रकट केले तर कय्यूम असर आणि शकील मेवाती यांनी सादरीकृत गझलांचे परीक्षण केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अहमद कलीम फैजपुरी यांनी उर्दू साहित्य चळवळ नव्याने जोम धरत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले. खान्देशच्या शायरांनी उर्दू साहित्यात दिलेल्या ऐतिहासिक योगदानाबद्दल माहिती दिली व ईमान ब्यावली, कमर भुसावली, सैफ भुसावली आणि मिर्जा मुस्तफा आबादी यांच्या निवडक शेरोशायरीवर प्रकाश टाकला. जग कितीही झपाट्याने बदलत असले तरी साहित्य निर्मिती प्रक्रियेत पारंपरिक मापदंडांना महत्वाचे स्थान आहे त्यांना सोडून दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकत नाही असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला अब्दुल रशीद कासमी, मुश्ताक करीमी यासह हनीफ खान ईस्माईल उर्फ मल्लू शेठ, हाजी अंसार और नदीम मिर्जा इत्यादी मान्यवर आणि जिल्ह्यातील अनेक उर्दू साहित्य प्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन हारुन उस्मानी व आभार अनीक फाऊंडेशनचे अध्यक्ष शकील हसरत यांनी केले.
 

Web Title: Mushayra ranges in the city of Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.