मुक्ताईनगर येथे ऐन सणासुदीत धान्य मिळेना-शिवसेना महिला आघाडी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 07:06 PM2018-10-21T19:06:19+5:302018-10-21T19:08:27+5:30

‘आधार लिंक’च्या घोळामुळे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना ऐन सणासुदीच्या काळात धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. हा तिढा तत्काळ सोडविण्यात यावा अन्यथा शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे तहसील कार्यालयात बांगड्या फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना महिला आघाडीतर्फे देण्यात आला आहे.

Muneena-Shivsena Women's Front is aggressive at Muktainagar | मुक्ताईनगर येथे ऐन सणासुदीत धान्य मिळेना-शिवसेना महिला आघाडी आक्रमक

मुक्ताईनगर येथे ऐन सणासुदीत धान्य मिळेना-शिवसेना महिला आघाडी आक्रमक

Next
ठळक मुद्देतिढा तत्काळ सोडवा अन्यथा तहसीलवर बांगड्या फेको आंदोलन - शिवसेना महिला आघाडीतूर, मका व ज्वारी खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावेतहसीलदारांना दिले निवेदन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : ‘आधार लिंक’च्या घोळामुळे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना ऐन सणासुदीच्या काळात धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. हा तिढा तत्काळ सोडविण्यात यावा अन्यथा शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे तहसील कार्यालयात बांगड्या फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना महिला आघाडीतर्फे देण्यात आला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही सात ते आठ महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा विभागाच्या चुकीमुळे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांसह कुटुंबातील सदस्यांचे आधार लिंक होताना इतर जिल्ह्यातील शिधापत्रिकेस ते लिंक झालेले आहेत, तर स्थानिक शिधापत्रिकेला इतर जिल्ह्यातील व दुसºयाच अनोळखी व्यक्तींचे आधार लिंक झालेले असल्याने सदर शिधापत्रिका धारकांना ई - पॉज मशीनद्वारे धान्य विकत घेताना प्रचंड मनस्ताप होत आहे. याचा गैरफायदा घेत काही दुकानदार सरळ सरळ लाभार्र्थींना धान्य नाकारत आहेत . यामुळे ऐन सनासुदीच्या दिवसात गरीब कुटुंब स्वस्त धान्याच्या लाभापासून वंचित राहत आहेत. येत्या १५ दिवसांवर दिवाळीसारखा महत्वाचा सण येवून ठेपला असून, या सणालादेखील सदर शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहतील.
तहसिलदारांनी तत्काळ कारवाई करीत आधार लिंकचा प्रश्न सोडवावा अन्यथा शिवसेना महिला आघाडीतर्फे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांसह येऊन तहसील कार्यालयावर बांगड्या फेको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाठ, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, उपशहर संघटक विद्या भालशंकर, उपतालुका संघटक उज्वला सोनवणे, उपतालुका संघटक सुनीता तळेले, उपशहर संघटक शारदा भोई, नगरसेविका सविता भलभले
दरम्यान, पावसाअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यास तत्काळ तूर, मका व ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी नायब तहसीलदार मिलिंद बाविस्कर यांना मागणीचे निवेदन दिले. या वेळी तालुकाप्रमुख छोटू भोई, अ‍ॅड. मनोहर खैरनार, गोपाळ सोनवणे, गटनेता राजेंद्र हिवराळे, शहरप्रमुख गणेश टोंगे, शेख हारुन मिस्त्री, अमरदीप पाटील, जाफर अली, संतोष माळी, गोकुळ पाटील, दीपक पवार यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.





 

Web Title: Muneena-Shivsena Women's Front is aggressive at Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.