मागासवर्ग महामंडळात गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:02 AM2019-06-14T11:02:15+5:302019-06-14T11:04:57+5:30

तिघांचे निलंबन झाल्याची माहिती: योजना स्थगित ठेवण्याचे पत्र

Misconduct in the Backward Classroom | मागासवर्ग महामंडळात गैरव्यवहार

मागासवर्ग महामंडळात गैरव्यवहार

Next

जळगाव : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातील बीज भांडवल योजनेतील बोगस कर्जप्रकरणातील कारवाई गतिमान होण्याची चिन्हे आहे. या प्रकरणात पंधरा ते वीस दिवसांपूर्वी तत्कालीन जिल्हा व्यवस्थापकांसह तिघांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे़ दरम्यान, गैरप्रकारामुळे सुधारीत मान्यताप्राप्त होईपर्यंत ही योजना स्थगित ठेवावी असे पत्रही महामंडळाला प्राप्त झाले आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची ५० हजार ते ५ लाखांपर्यंतची प्रकल्प मर्यादा असलेल्या बीजभांडवल योजनेअंतर्गत जिल्ह्यात महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, बँक कर्मचारी व दलाल व्यक्तिंच्या संगनमतनाने बनावट व खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस लाभार्भी तयार करून कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली. २०१२ ते २०१९ दरम्यान ही बोगसप्रकरणे असल्याचे समजते. या प्रकरणाची विभागस्तरावरून चौकशी सुरू आहे़ या चौकशी दरम्यान, गैरप्रकार झाल्याचे प्राथमिक स्तरावर निष्पन्न झाल्यानंतर तिघांचे पंधरा दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी सुरू असून यासंदर्भात अधिक वाच्यता करता येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, यात लवकरच ठोस कारवाई व अनेकांची चौकशी होणार असल्याचेही सांगण्यात आले. महामंंडळाच्या स्थानिक कार्यालयात माहिती घेतली असता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला.वरिष्ठ पातळीवरून ही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले़ दरम्यान, चौकशीसाठी काही फाईल्सही ताब्यात घेतल्या आहेत.
आॅनलाईन नवी योजना सुरू करणार
जळगावप्रमाणे अन्य जिल्ह्यात बोगस लाभार्थ्यांची कर्जप्रकरणे मंजूर होणार नाहीत, या अनुषंगाने सद्यस्थितीतील योजनेत सुधारणा करून आॅनलाईन पद्धतीने नवीन योजना सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे पत्र स्थानिक महामंडळाच्या कार्यालयास २१ मे रोजी प्राप्त झाले आहे.
अर्ज न स्वीकारण्याचे आदेश
गैरप्रकारची चौकशी सुरू असल्याने बीजभांडवल या योजनेअंतर्गत कोणतेही अर्ज स्वीकारू नयेत तसेच पूर्वी स्वीकारलेले अर्ज बँकेने मंजूर केलेल्या प्रकरणात कोणतेही अनुदान व बीज भांडवल मंजूर करण्यात येऊ नये, असे आदेश आहेत. आदेशाचे उल्लंंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा सर्व प्रादेशिक व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापकांना दिला आहे़ संचालक कमलाकर फंड यांनी हे पत्र दिले आहे.

Web Title: Misconduct in the Backward Classroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.