Midnight Coimbing Operation in Jalgaon Sensitive Areas | जळगावात संवेदनशील भागात मध्यरात्री कोम्बींग आॅपरेशन
जळगावात संवेदनशील भागात मध्यरात्री कोम्बींग आॅपरेशन

ठळक मुद्देपोलिसांनी केली रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणीसंशयितांकडून चॉपर, तलवारी व सुरा जप्तहद्दपार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१६ : शहरातील संवेदनशील भागात मंगळवारी मध्यरात्री अचानकपणे कोम्बींग आॅपरेशन राबविण्यात आले. बुधवारी पहाटे चार वाजेपर्यंत चाललेल्या या कोम्बींग आॅपरेशनमध्ये रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली तर अनेक गुन्हेगारांच्या घरात तलवारी, चॉपर व सुरा यासारखे शस्त्र आढळून आले. हद्दपार असलेला संजय त्र्यंबर पोपटकर (रा.रायसोनी नगर, जळगाव) हा आरोपीही आढळून आला. त्याला अटक करण्यात आली आहे.
जळगाव पोलिसांकडून रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत समता नगर, रायसोनी नगर, राजीव गांधी नगर, पिंप्राळा व हुडको या भागात हे आॅपरेशन राबविण्यात आले. त्यात फारुख शेख बिसमिल्ला (रा.पिंप्राळा) याच्याकडे सुरा आढळून आला. पकड वारंटमधील रवींद्र केशव मालचे व अनुप रघुनाथ पानपाटील हे मिळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले.
शनी पेठेत २३ गुन्हेगार तपासले
शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिलक उर्फ टिल्लया पन्नालाल सारसर (वय २८, रा.गुरुनानक नगर, जळगाव) याच्याजवळ सुरा तर पंकज भानुदास चौधरी (वय १९ रा.ममुराबाद नाका, जळगाव) व पिनु उर्फ रणजीत माणिक सूर्यवंशी (वय ३०, रा.कोळी पेठ, जळगाव) या दोघांजवळ प्रत्येकी एक चॉपर आढळून आला. या हद्दीत २३ गुन्हेगार तपासण्यात आले.
अट्टल गुन्हेगाराजवळ सापडली तलवार
एमआयडीसी पोलिसांनी राबविलेल्या कोम्बींगमध्ये गोपाल देविदास बाटुंगे (वय ३४, रा.कंजरवाडा, तांबापुरा, जळगाव) याच्याजवळ तलवार आढळून आली. मुजमीर शेख ईस्माइल शेख (वय २२ रा.यावल) हा अयोध्या नगरात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरतांना आढळून आला. रिजवान शेख गयोद्दीन (रा.बिसमिल्ला चौक, जळगाव) याच्याकडे तलवार आढळून आली. दरम्यान, ज्या गुन्हेगारांकडे शस्त्र आढळून आली, त्यांच्यावर आर्मअ‍ॅक्टचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.


Web Title: Midnight Coimbing Operation in Jalgaon Sensitive Areas
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.