चाळीसगाव येथे पालिकेच्या घंटागाड्यांवर स्वच्छतेचे संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 03:46 PM2019-01-08T15:46:16+5:302019-01-08T15:49:22+5:30

स्वच्छता अभियान व्यापकपणे राबविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. पथनाट्य, माहितीपत्रके वाटून स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे. चाळीसगाव पालिकेनेही घंटागाड्यांवर स्वच्छता संदेश देणाऱ्या घोषवाक्याची सजावट केली असून, १४ गाड्या शहरातून कचरा संकलन करतानाच स्वच्छतेचा प्रसारही करतील. पालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असणाºया १४ घंटागाड्यांवर स्वच्छतेचा संदेश देणारे स्टीकर चिकटवले जात आहेत. सद्य:स्थितीत ‘स्वच्छता मिशन’ सुरू असून, ते ३१ जानेवारीपर्यंपर्यंत ते चालणार आहे.

The message of cleanliness on the Ghantangas of Chalisgaon | चाळीसगाव येथे पालिकेच्या घंटागाड्यांवर स्वच्छतेचे संदेश

चाळीसगाव येथे पालिकेच्या घंटागाड्यांवर स्वच्छतेचे संदेश

googlenewsNext
ठळक मुद्दे१४ गाड्यांचे बदलले रुपडेपालिकेतर्फे राबविले जातेय स्वच्छता अभियान३१ जानेवारीपर्यंत राहणार अभियान, पुढे त्यात असेल सातत्य

चाळीसगाव, जि.जळगाव : स्वच्छता अभियान व्यापकपणे राबविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. पथनाट्य, माहितीपत्रके वाटून स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे. चाळीसगाव पालिकेनेही घंटागाड्यांवर स्वच्छता संदेश देणाऱ्या घोषवाक्याची सजावट केली असून, १४ गाड्या शहरातून कचरा संकलन करतानाच स्वच्छतेचा प्रसारही करतील.
पालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असणाºया १४ घंटागाड्यांवर स्वच्छतेचा संदेश देणारे स्टीकर चिकटवले जात आहेत. सद्य:स्थितीत ‘स्वच्छता मिशन’ सुरू असून, ते ३१ जानेवारीपर्यंपर्यंत ते चालणार आहे.
घंटागाड्या शहरातून मोठ्या प्रमाणावर कचरा संकलनाचे काम करतात. थेट दारापर्यंत येऊन घंटागाडी ‘कचरा द्या’, अशी वर्दीच एकप्रकारे देते. यामुळे कचरा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला, वयोवृद्ध माणसे व मुलेही गाडीजवळ येतात. तेव्हा गाडीवर असणारे स्वच्छता संदेशाचे ते वाचन करतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होऊन जनजागृती घडून येते.
कचरा टाका भराभरा
कचरा संकलन करणाºया घंटागाड्यांचे रुपडे आकर्षक करताना त्यावर स्वच्छता संदेश देण्यात आले आहे. लहान मुलांना कार्टूनचे असणारे आकर्षक लक्षात घेऊन त्याचीही सजावट केली आहे.
ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छताग्रह यासह ‘घंटागाडी येती दारा... कचरा टाका भराभरा’ असे संदेश घंटागाड्यांवर रेखाटले आहे. स्वच्छ भारत मिशनचे बोधचिन्ह असून रुपडे बदलेल्या घंटागाड्या शहरात आकर्षणाचा विषय ठरल्या आहेत.

यंदाचे हे वर्ष पालिकेचे शतक महोत्सवी वर्ष आहे. नागरिकांना स्वच्छतेच्या अधिकाधिक सुविधा पुरविण्याचा संकल्प केला आहे. १४ घंटागाड्यांची खरेदी केली असून स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविताना नागरिकांचा सहभाग वाढविण्याकरिता घंटागाड्यांवर स्वच्छता संदेश देणारी रेखाटने साकारली आहेत.
- वैशाली सोमसिंग राजपुत
आरोग्य सभापती, नगरपालिका, चाळीसगाव

Web Title: The message of cleanliness on the Ghantangas of Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.