बामणोदच्या महिलेवर भुसावळात सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 06:24 PM2019-04-14T18:24:17+5:302019-04-14T18:25:57+5:30

यावल तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय महिलेवर भुसावळात सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Mass rape in Bhusaval on Bamodod's woman | बामणोदच्या महिलेवर भुसावळात सामूहिक बलात्कार

बामणोदच्या महिलेवर भुसावळात सामूहिक बलात्कार

Next
ठळक मुद्देरेल्वे स्थानकातून केले अपहरणचार दिवस अत्याचारअपहरण करून अत्याचार केल्याची तक्रार

भुसावळ, जि.जळगाव : यावल तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय महिलेवर भुसावळात सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल होऊन तो लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला. बामणोद येथील पीडित महिला घरातून संतापाच्या भरात ११ एप्रिल रोजी निघाल्यानंतर भुसावळ रेल्वेस्थानकावर आली, तर दोघांनी तिचे अपहरण करून तिच्यावर चार दिवस अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी पीडितेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून जवाब नोंदवला तर रविवारी तिची वैद्यकीय चाचणीदेखील करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अपहरण करून अत्याचार केल्याची तक्रार
आईसह भावाशी वाद झाल्याने बामणोद येथील २२ वर्षीय महिला संतापाच्या भरात ११ रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर दोन संशयितांनी विवाहितेच्या डोळ्यावर पट्टी बांधली. तिचे अपहरण करीत तिच्यावर सलग चार दिवस अत्याचार करीत तिला पुन्हा रेल्वेस्थानकावर सोडल्याची तक्रार आहे. तत्पूर्वी या महिलेला गावातील एका तरुणाने रेल्वेस्थानकावर फिरताना पाहिल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांना कल्पना देण्यात आली. नातेवाईकांनी तिचा ताबा घेत फैजपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या विवाहितेला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून, तेथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शनिवारी रात्री लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरी यांनी या महिलेचा जवाब नोंदवला.
महिलेच्या जवाबात तफावत
लोहमार्गचे निरीक्षक दिलीप गढरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता दरवेळी जवाब बदलत आहे. सुरुवातीला या महिलेने दोन जणांनी रेल्वेस्थानकावरून अपहरण केल्याचा जवाब फैजपूर पोलिसांना दिला, तर लोहमार्ग पोलिसांना केलासायडींगच्या बाजूला असताना संशयितांनी आपले अपहरण करून डोळ्याला पट्टी बांधत निर्जन स्थळी नेवून अत्याचार केल्याचे तसेच काही अश्लील फोटोही काढल्याचा जवाब दिला आहे. त्यामुळे नेमके काय व कसे घडले? याबाबत आम्ही खोलवर तपास करीत आहोत.
पोलिसांकडून फुटेजची तपासणी
लोहमार्ग पोलिसांकडून पीडितेच्या जवाबाच्या अनुषंगाने ११ ते १३ एप्रिलदरम्यानच्या फुटेजची पाहणी केली जात आहे. या महिलेकडे तिकीट नसल्याने तिकीट निरीक्षकानेदेखील तिला हटकल्याची बाब समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार अनोळखींनी तिचे अपहरण करून अत्याचार केल्याचे नमूद आहे तर या अनुषंगाने लोहमार्ग पोलिसांकडून बारकाईने या बाबी तपासल्या जात आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी लोहमार्गचे पोलीस उपअधीक्षक विलास नारनवर यांनी पीडितेची भेट घेऊन माहिती जाणून घेतली.
 

Web Title: Mass rape in Bhusaval on Bamodod's woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.