शेतमालाची आवक वाढल्याने बाजार समिती गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:08 AM2018-05-24T00:08:12+5:302018-05-24T00:08:12+5:30

चाळीसगाव : खरिपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची धांदल

Market Committee Gets Due to Increase in Farming | शेतमालाची आवक वाढल्याने बाजार समिती गजबजली

शेतमालाची आवक वाढल्याने बाजार समिती गजबजली

Next
ठळक मुद्देगेल्या तीन ते चार वर्षांपासूून चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत आहे. बाजार समितीने तीन वर्षांपूर्वी स्वतंत्र कांदा मार्केट सुरू केल्याने कन्नड, नांदगाव येथून कांदा विक्रीसाठी बाजार समितीत येतो. मात्र गेल्या १५ दिवसात कांद्याचे दर कोसळले मका वगळता गहू, बाजरी, ज्वारी आदी धान्य मालाची आवक मंदावली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ज्वारी ५०० ते ६०० क्विंटल, बाजरी ४५० ते ५०० क्विंटल, गहू २०० ते ३०० क्विंटल आवक होत आहे. मात्र मका, कांदा आणि केळी मालाचा ओघ चांगला आहे.एकीकडे पाण्याअभावी केळी बागांनी माना टाकल्या असताना पाणी नसल्यानेही उत्पादक शेतकरी जेरीस आले आहेत. बागायती पट्ट्यात मात्र केळीने शेतकºयांना हात दिला आहे. बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून नवती, कांदेबाग लागवडीतील केळी मालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्य

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि.जळगाव, दि.२३ : खरीप हंगामाची लगबग, मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला झालेली सुरुवात या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी शेतमाल विक्रीसाठी आणल्याने बुधवारी बाजार समिती गजबजून गेली होती. गेल्या महिन्याच्या तुलनेत गत आठ दिवसात बाजार समितीत आवक वाढली असल्याचे आडत व्यापाºयांनी सांगितले.
चाळीसगाव तालुक्यात मान्सूनपूर्व कपाशीचा पेरा केला जातो. १५ मे नंतर शेतकरी पेरते होतात. यंदा जलपातळी खालावली आणि सिंचन प्रकल्पांमध्ये ठणठणाट असल्याने मान्सूनपूर्व अर्थाचच धूळपेरणीवर परिणाम होणार आहे. सद्य:स्थितीत खरीप हंगामाच्या मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असल्याने बी-बियाणे, खते विकत घेण्यासाठी शेतकºयांनी शेतमाल विक्रीस काढला आहे. यामुळेच बाजार समितीत धान्याची आवक वधारली असून, तेजीची झळाळीदेखील आहे.
मका, ज्वारी, बाजरी, कांदे, गहू आणि केळीची आवक होत आहे.
मक्याला झळाळी
गत हंगामात तालुक्यात ८७ टक्केच पर्जन्यमान झाले. दुष्काळसदृश्य परिस्थिती असली तरी ‘मक्या’ने शेतकºयांना तारले आहे. मक्याचा ओघ सुरुच असून, तो कोरडा असल्याने दरही वाढले आहेत. १ हजार ५० ते १ हजार १९५ रुपये प्रति क्विंटलने बुधवारी मक्याचे लिलाव पुकारले गेले. दरदिवशी १४०ते१५० ट्रॅक्ट्रर मक्याची आवक होत आहे.
गहू, बाजरीलाही तेजी
ज्वारी, बाजरी, गहू आदी धान्य मालाची आवक फारशी नसल्याने दरांमध्ये तेजी आली आहे. ज्वारी एक हजार ते एक हजार ४००, बाजरी ९०० ते एक हजार ३५०, गहू एक हजार ७०० ते दोन हजार ४०० रुपये प्रति क्विंटल असे भाव आहेत. दरांमध्ये तेजी असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
बुधवारी बाजार समितीत फळ बाजार ‘केळीमय’ झाल्याचा पहावयास मिळाला. चांगल्या प्रतीच्या केळीची तोड झाल्यानंतर व्यापारी बागेतच खरेदी करतात. दुय्यम प्रतीचा माल शेतकºयांना बाजार समितीतच विक्रीसाठी आणावा लागतो.
२० रोजीच्या केळी लिलावात तेजीची झळाळी होती. २० घडांना अडीच हजारांचा भाव मिळाला. उन्हाचा दाह वाढल्याने गेल्या चार दिवसात हे दर खाली कोसळले आहेत. बुधवारी उच्चांकी आवक होऊनही २० घडांना अवघा ७०० रुपयांचा भाव मिळाला.

खरीप हंगामाच्या तयारीला वेग आल्याने शेतकºयांनी बी-बियाणे व खते विकत घेण्यासाठी शेतमाल विक्रीसाठी आणला आहे. यामुळे बाजार समिती गजबजून गेली आहे.
- अशोक पाटील
सचिव, बाजार समिती, चाळीसगाव






 

Web Title: Market Committee Gets Due to Increase in Farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.