भडगाव येथील वाडे येथे मानसकन्येने दिला आईला अग्निडाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 04:08 PM2019-01-18T16:08:21+5:302019-01-18T16:10:53+5:30

भडगाव तालुक्यातील वाडे येथील दुर्गाबाई नारायण चौधरी यांचे १२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ९१ वर्ष होते. या दुर्गाबार्इंना मानसकन्या रजुबाई चौधरी यांनी अग्नीडाग दिला. यामुळे बेटी बचाव बेटी पढावचा संदेश मिळाला.

Mankassane gave birth to Agnidag in the wade of Bhadgaon | भडगाव येथील वाडे येथे मानसकन्येने दिला आईला अग्निडाग

भडगाव येथील वाडे येथे मानसकन्येने दिला आईला अग्निडाग

Next
ठळक मुद्देबेटी पढाव बेटी बचावचा मिळाला संदेशमूलबाळ नसल्याने वृद्धेने रजूबाईला घेतले होते दत्तकवृद्धापकाळात भासू दिली नाही कोणतीही उणीव

अशोक परदेशी
भडगाव, जि. जळगाव : तालुक्यातील वाडे येथील दुर्गाबाई नारायण चौधरी यांचे १२ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय ९१ वर्ष होते. या दुर्गाबार्इंना मानसकन्या रजुबाई चौधरी यांनी अग्नीडाग दिला. यामुळे बेटी बचाव बेटी पढावचा संदेश मिळाला.
याबाबत माहिती अशी की, दुर्गाबाइ चौधरी व त्यांचे पती नारायण चौधरी हे शिक्षक होते. पण दुर्गाबार्इंनी नोकरी सोडून शेतीची कास धरली व शेतीमध्ये उत्तम प्रगती केली. परंतु त्याना मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी आपल्या आर्वी येथील मोठ्या बहिणीच्या मुलीचा अर्थात राजूबाईचा सांभाळ करत बालपणापासून संगोपन केले. त्यांचे शिक्षण व लग्न करून कन्यादानाचे पुण्य प्राप्त केले. दुर्गाबार्इंना शिक्षणाची आवड असल्याने आपले माहेर बेटावद, ता.शिंदखेडा येथे शाळेला स्वखर्चाने खोल्या बांधून दिल्या.
दुर्गाबार्इंच्या वृद्धापकाळात त्यांच्या पतीच्या निधनानंतर मानस कन्या रजुबाई व त्यांचे पती तुकाराम चौधरी तसेच त्यांचे नातवंडं व सुना यानी उत्तमप्रकारे सुश्रुषा केली. त्यांना वृद्धापकाळात कोणत्याच गोष्टीची उणीव भासू दिली नाही.
दुर्गाबार्इंच्या अंत्ययात्रेच्या वेळी त्यांच्या मानसकन्या रजुबाई यांनी त्यांना अग्नीडाग दिला . हे दुर्गाबार्इंच्या संस्कारामुळेच शक्य झाले व त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण करून दिला की, आज समाजामध्ये मुलांपेक्षा मुलीही कमी नाहीत. या निर्णयामुळे रजुबाईचे वाडे व पंचक्रोशीतील नागरिकाकडून कौतुक होत आहे.
आज खऱ्या अर्थाने बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश या घटनेच्या माध्यमातून समाजाला मिळाला.
आजीचा अंत्यसंस्कार नातवंडांनी देशी गाईच्या गोवºया व देशी गाईचे तूप यांच्यामध्ये आगळया वेगळया पद्धतीने शोकाकुल वातावरणात केला.

Web Title: Mankassane gave birth to Agnidag in the wade of Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.