जळगाव रेल्वे स्टेशननजीकच्या पोलीस चौकीजवळच मांडला जुगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:06 PM2018-06-25T14:06:12+5:302018-06-25T14:11:44+5:30

अवैध धंद्यात मोडला जात असलेला लाल, काला, पिला (झन्ना मन्ना) व गुडगुडी याचा रेल्वे स्टेशन व नवीन बी. जे. मार्केट या परिसरात भररस्त्यावर खुलेआम सुरुआहे.

Mandla Gambling Near the Police Chawki of Jalgaon Railway Station | जळगाव रेल्वे स्टेशननजीकच्या पोलीस चौकीजवळच मांडला जुगार

जळगाव रेल्वे स्टेशननजीकच्या पोलीस चौकीजवळच मांडला जुगार

Next
ठळक मुद्दे‘लाल-काला-पिला’कडे पोलिसांचे सपशेल दुर्लक्षशैक्षणिक शुल्क व दवाखान्याचे पैसे हरतायेत विद्यार्थीपोलिसांच्या दुर्लक्षामुळे पालकवर्गाकडून नाराजीदिवसाला एका ठिकाणी २५ ते ३० हजाराच्यावर उलाढाल

जळगाव : अवैध धंद्यात मोडला जात असलेला लाल, काला, पिला (झन्ना मन्ना) व गुडगुडी याचा रेल्वे स्टेशन व नवीन बी. जे. मार्केट या परिसरात भररस्त्यावर खुलेआम सुरुआहे. ग्रामीण भागातून शाळा प्रवेशासाठी तसेच दवाखान्याचे बील भरण्यासाठी आलेले अनेक तरुण या धंद्यात पैसे गमावत आहेत. विशेष म्हणजे या अवैध धंद्याला पोलिसांचेच संरक्षण मिळाल्याचे दिसून येत आहे.
शहरात सट्टा, जुगार, अवैध दारु, भंगार बाजारात चोरीच्या वाहनांची विल्हेवाट यासारखे अवैध धंदे नेहमीच सुरु होतात, नंतर काही दिवसासाठी बंद होतात, मात्र, लाल-काला-पिला नावाचा हा खेळ कोणत्याही परिस्थितीत बंद होत नाही, किंबहूना त्याबाबत फारशी कोणी ओरड करताना दिसत नाही. अन्य धंद्यांपेक्षा या धंद्यातून गुन्हेगारी जन्माला येत आहे.
शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रेल्वे स्टेशन व जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत नवीन बी.जे.मार्केट या परिसरात रस्त्यावर खुलेआम हे धंदे सुरु आहेत. या रस्त्यावरुन नेहमीच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा वावर असतो, परंतु त्या व्यवसायाकडे कोणी ढुंकून पाहत नाही, कारण त्याचे गांभीर्यच कोणाला कळलेले नाही. हा धंदा वरवर किरकोळ वाटत असला तरी त्यातून दिवसाला एका ठिकाणी २५ ते ३० हजाराच्यावर उलाढाल होते. सायंकाळी या पैशाचे वाटप केले जाते.
रेल्वे स्टेशन परिसरात नाशिक व सुरत या दोन पॅसेंजर गाड्या येण्याच्या व जाण्याच्या वेळी हा धंदा जोरात चालतो. शहरात विविध महाविद्यालयात प्रवेशासाठी आलेले तरुण या व्यवसायात शुल्काची रक्कम हरले आहेत तर काही जण नातेवाईकाचे किंवा घरातील व्यक्तीचे दवाखान्याचे बील भरण्यासाठी आणलेले पैसे हरलेले आहे. बी.जे.मार्केट परिसरात बाजारानिमित्त शहरात आलेले ग्रामीण भागातील लोक या धंद्यात पैसे गमावत आहेत. खेळाच्या ठिकाणी खेळ चालविणारेच बाहेरचे असल्याचे भासवून खेळतात व पैसे जिंकत असल्याचे भासवून तरुणांना खेळाकडे आकर्षित केले जाते.
या खेळात कदाचित कोणी पैसे जिंकला असेल, तर त्याला सहीसलामत तेथून जावू दिले जात नाही. पैसे जिंकल्यानंतर तुला येथून जाताच येणार नाही, आणि जाण्याचा प्रयत्न केलाच,तर दहा ते पंधरा जण मिळून त्याला घेरले जाते. जिंकलेले पैसे हिसकावले जातात किंवा खेळण्यासाठी मजबूर केले जाते. खेळणाराही बोंब होऊ नये म्हणून तक्रार करीत नाही. दरम्यान, या ठिकाणी ग्रामीण भागातील तरुणांना बेदम मारहाण झालेली आहे. बी.जे.मार्केट येथे तर शनिवारी मोठा बाजार भरतो. स्टेशनला दररोज सकाळ, संध्याकाळ खेळ चालतो.

Web Title: Mandla Gambling Near the Police Chawki of Jalgaon Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.