मुक्ताईनगरात युवकांचा स्वच्छतेसाठी पहारा आणि जागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:02 AM2018-08-20T01:02:10+5:302018-08-20T01:05:21+5:30

मुक्ताईनगरात उघड्यावर शौचास बसण्याऱ्यांना त्या कृत्यापासून रोखण्यासाठी रात्री उशीरापर्यंत पहारा देत, तसेच पहाटे देखील निगराणी राखत अशा लोकांमध्ये जागृती करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे.

 Maintenance and awareness campaign for youths in Muktainagar | मुक्ताईनगरात युवकांचा स्वच्छतेसाठी पहारा आणि जागृती अभियान

मुक्ताईनगरात युवकांचा स्वच्छतेसाठी पहारा आणि जागृती अभियान

Next
ठळक मुद्देआठवडे बाजार परिसरात जागृती अभियानामुळे स्वच्छतासमजुतदारीने राबविले जातेय अभियान

मुक्ताईनगर जि. जळगाव : शहरातील नागेश्वर मंदिराजवळील रस्त्यावर व आठवडे बाजार परिसरामध्ये उघड्यावर शौचास न बसण्यासाठी व स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी आठवडे बाजारातील काही युवकांनी प्रदीप सोनार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत अभियान सुरू केले आहे. या युवकांकडून रात्री उशिरापर्यंत व पहाटेच जागता पहारा दिला जात आहे. तसेच नागरिकांना उघड्यावर शौचास बसण्यापासून परावृत्त केले जात असल्याची एक चळवळच मुक्ताईनगर शहरात राबवली जात आहे.
गेल्या अनेक वर्षापासून जुने गावठाणातील नागेश्वर मंदिर रस्त्याकडून आठवडे बाजाराकडे जाणाºया रस्त्यावर नेहमी अनेक जण उघड्यावर शौचास बसत असत. त्यामुळे रहिवाशांना याचा कायमचा त्रास होता. मात्र आठवडे बाजार परिसरातील प्रदीप सोनार या युवकाने भारताच्या पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानाचा दिलेला संदेश यामुळे प्रेरित होऊन या परिसरात कायम स्वच्छता राहावी व नागरिकांनी उघड्यावर शौचास बसू नये म्हणून एक अभियानच गेल्या चार महिन्यांपासून सुरू केले आहे. त्यांच्यासमवेत भिवसन पालवे, अशोक माळी, किसन मिस्तरी, अशोक पाथरकर, अश्विन भोई, शुभम भोई , निलेश धनगर, मंगेश कोळी , संजय मराठे, आकाश गायकवाड, सागर जाधव, राहुल राणे आणि आठवडे बाजारातील ग्रामस्थ उपस्थित राहून या अभियानाला मोहिमेचे स्वरूप देत आहेत.
रात्री उशीरापर्यंत पहारा
विशेष म्हणजे रात्री बारा-साडेबारापर्यंत हे युवक या रस्त्यावर थांबून असतात . आणि पुन्हा सकाळी साडेतीन वाजेपासून युवक गटागटाने या रस्त्यावर उभे राहून नागरिकांमध्ये जागृती करत आहेत.
नागेश्वर मंदिरापासून आठवडे बाजाराकडे जाणारा हा रस्ता या स्तुत्य उपक्रम आणि जनजागृतीमुळे गेल्या चार महिन्यांपासून दुर्गंधी मुक्त रस्ता बनलेला दिसून येत आहे. ‘आपल्या शहराचे उत्तम आरोग्य हे आपल्याच हातात असून, आपणच जर आरोग्य बिघडवणार असू तर हे आपलेच नुकसान आहे. असा संदेश आपण नागरिकांना देत असल्याचेही प्रदीप सोनार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.


 

Web Title:  Maintenance and awareness campaign for youths in Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.