ओटीएसअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील १६ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 10:53 PM2018-10-23T22:53:34+5:302018-10-23T22:55:15+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३४ हजार ५२९ शेतकºयांना ९८३ कोटींची कर्जमाफी

lone settelment by ots of 16 thousand farmers in Jalgaon district pending | ओटीएसअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील १६ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली

ओटीएसअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील १६ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली

Next
ठळक मुद्देस्वहिस्सा भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढओटीएस योजनेंतर्गत १० हजार शेतकºयांना झालीय ११४ कोटींची कर्जमाफी

जळगाव: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजेच कर्जमाफी योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या १६ हजार ८५ शेतकºयांनी एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेखाली त्यांच्या हिश्याची दीड लाखांच्यावरील रक्कम न भरल्याने त्यांची सुमारे ११० कोटींची कर्जमाफी रखडली आहे. दरम्यान शासनाने ही रक्कम भरण्यासाठी योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वाढविली आहे.
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजने अंतर्गत दीड लाखांच्या थकबाकीला माफी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ज्या शेतकºयांची थकबाकी दीड लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता (ओटीस) योजना आणली. त्यात पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्याची म्हणजेच दीड लाखांच्यावरील उर्वरीत संपूर्ण रक्कम शासनाला भरल्यानंतर त्यांना दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार होता. ही रक्कम भरण्याचा कालावधी दिनांक ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत होता. जिल्ह्यात २५ हजार ८५८ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असल्याने त्यांनी स्व-हिस्सा भरल्यास त्यांना २२४ कोटी २१ लाख २३ हजारांची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतच्या मुदतीत केवळ ९७७३ शेतकºयांनीच स्व-हिस्सा भरल्याने त्यांना ११३ कोटी ७१ लाख रूपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. उवररीत १६ हजार ८५ शेतकºयांनी त्यांची स्व-हिस्सा रक्कम न भरल्याने त्यांची ११० कोटींची कर्जमाफी रखडली आहे.
ओटीएस योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
ओटीएस योजनेंतर्गत शेतकºयांनी स्व-हिस्सा भरण्यास शासनाने मुदतवाढ दिली असून आता ही मुदत ३१ डिसेंबर, २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आह, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतक-यांनी आपल्या हिश्याची रक्कम वरील मुदतीत बँकामध्ये भरुन सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ९८३ कोटींची कर्जमाफी
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १० ग्रीन लिस्ट प्राप्त झाल्या असून त्यात २ लाख ३४ हजार ५२९ शेतकºयांना ९८३ कोटी १२ लाखांची कर्जमाफी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात जिल्हा बँकेच्या १ लाख ९४ हजार ४९८ खातेदारांना ७५८ कोटी ७९ लाखांची तर राष्टÑीयकृत बँकांच्या ४० हजार ३१ लाभार्र्थींना २२४ कोटी ३३ लाखांची कर्जमाफी झाली आहे. विशेष म्हणजे राष्टÑीयकृत बँकांकडे मात्र त्यांच्याकडील कर्जमाफीची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे समजते. अद्यापही शासनाकडून ग्रीनलिस्ट येतच असून नुकतीच जाहीर झालेली ११ ग्रीन लिस्ट जाहीर होताच रद्द झाली आहे.

Web Title: lone settelment by ots of 16 thousand farmers in Jalgaon district pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.