‘लोकमत’ च्या जामनेर येथील वार्ताहरावरील हल्ल्याचा जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:40 PM2018-10-23T13:40:41+5:302018-10-23T13:41:31+5:30

दोषीवर कठोर कारवाई करा

'Lokmat' attack on Varanha in Jamnar protested at Jalgaon district | ‘लोकमत’ च्या जामनेर येथील वार्ताहरावरील हल्ल्याचा जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध

‘लोकमत’ च्या जामनेर येथील वार्ताहरावरील हल्ल्याचा जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी निषेध

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा पत्रकार संघातर्फे निवेदन जामनेर येथे रविवारी ही मारहाणीची घटना घडली

जळगाव : दुर्गा विसर्जन मिरवणुकीतील वादाची बातमी दिल्याचा राग आल्याने जामनेर येथील भाजपाच्या नगरसेवक पूत्राने जामनेर येथील ‘लोकमत’ चे वार्ताहर लियाकत सैय्यद यांना लोखंडी रॉड व काठीने मारहाण केल्याच्या घटनेचा जिल्ह्यात ठिकठिकाणी तीव्र निषेध केला जात आहे. या संदर्भात मंगळवारी जिल्ह्यात वेगवेगळ््या ठिकाणी निवेदन देण्यात आले.
दरम्यान जळगाव येथेही जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
जामनेर येथे रविवारी ही मारहाणीची घटना घडली. जामनेर येथील भाजपाचे नगरसेवक बाबुराव हिवराळे यांचा मुलगा विलास हिवराळे, मोनू जाधव, युवराज खाटीक, छोटू धनगर व इतरांनी लियाकत सैय्यद यांना मारहाण केली होती. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली.
मंगळवारी भुसावळ, चाळीसगाव, बोदवड, अमळनेरसह जिल्हाभरात ठिकठिकाणी निवेदन देण्यात येऊन हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. हे कार्य करीत असताना असे भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. कठोर कारवाई न झाल्यास कडक आंदोलन करण्याचा इशार पत्रकार संघाने निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: 'Lokmat' attack on Varanha in Jamnar protested at Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.