जलयुक्त शिवार अभियानात लोहारा गाव विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 5:22pm

जलयुक्त शिवार अभियानात अमळनेर तालुका विभागात पहिला

आॅनलाईन लोकमत जळगाव,दि.१० : मृद व जलसंधारण विभागातर्फे राबविण्यात येणाºया जलयुक्त शिवार अभियानात पाचोरा तालुक्यातील लोहारा जिल्हास्तरावर प्रथम आले आहे. विभागस्तरावर अमळनेर तालुक्याने बाजी मारली आहे. मृद व जलसंधारण विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराची घोषणा शासनातर्फे करण्यात आली. त्यात जिल्हास्तरावर प्रथम- लोहारा,ता.पाचोरा, द्वितीय- वाकडी,ता.चाळीसगाव, तृतीय : देऊळगाव, ता.जामनेर, उत्तेजनार्थ : वढोदा, ता.मुक्ताईनगर व उमाळे, ता.जळगाव. विभागास्तरावर प्रथम : अमळनेर तालुका, द्वितीय : चाळीसगाव तालुका. जिल्हास्तरावरील पत्रकारितेत उत्कृष्ठ काम केल्याबद्दल प्रथम : सुधाकर पाटील, द्वितीय : विजय पाठक, उत्कृष्ठ काम केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त अधिकारी/कर्मचारी प्रथम : मनोज घोडेपाटील (उपविभागीय अधिकारी), द्वितीय : श्रीकृष्ण हरचंद देवरे (कृषि सहाय्यक). विभागस्तरावर पुरस्कार प्राप्त तालुका द्वितीय : अमळनेर,जि.जळगाव, विभागस्तरावर पुरस्कार प्राप्त गाव द्वितीय : लोहारा, ता.पाचोरा.

जळगाव कडून आणखी

जळगाव जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञा अभावी महिलेची प्रसूती ताटकळली
वाळू वाहतूकदारांच्या खब-यांवर करणार गुन्हे दाखल, जळगावात तीन ट्रॅक्टर जप्त
भुसावळच्या धान्य दुकानदारास कारणे दाखवा नोटीस, 234 गोण्या धान्य असलेला ट्रक नशिराबाद पोलीस ठाण्यातच
चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडताना नगरपालिका कर्मचा-याचा मृत्यू
कार व बाईकची समोरासमोर धडक होऊन अपघात, दोन जणांचा मृत्यू  

आणखी वाचा