कळमसरे येथील बालिका अत्याचार प्रकरणी पालकांनी ठोकले शाळेला कुलूप, शिक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:44 PM2018-02-24T12:44:40+5:302018-02-24T12:55:42+5:30

शिक्षकाला बडतर्फ करण्याची मागणी केली

Locked to the school, the parents locked up the girl child in the Kalmsare case | कळमसरे येथील बालिका अत्याचार प्रकरणी पालकांनी ठोकले शाळेला कुलूप, शिक्षक निलंबित

कळमसरे येथील बालिका अत्याचार प्रकरणी पालकांनी ठोकले शाळेला कुलूप, शिक्षक निलंबित

googlenewsNext
ठळक मुद्देमुली व पालकांचे घेतले जबाब बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवावा

आॅनलाइन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. २४ - कळमसरे जि. प. शाळेच्या विद्यार्थीनींवर लैंगिक अत्याचार करणाºया जगदीश भास्कर पाटील या शिक्षकावर चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दुसºया दिवशीही या घटनेचे पडसाद उमटून संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. मुलींच्या शाळेत महिलाच शिक्षिका नेमाव्यात ही भूमिका घेऊन जगदीश पाटील यास बडतर्फची मागणी केली. शाळेतील इतर शिक्षकांनी अखेर बाहेर वर्ग भरवून मुलांना शिकवले. दरम्यान, प्रभारी गटविकास अधिकारी एस.डी. वायाळ यांनी संबंधित शिक्षकास निलंबित करण्याचे आदेश देऊन सोमवारी बडतर्फीचा प्रस्ताव पाठवा, अशा सूचना त्यांनी शिक्षण विभागास दिल्या. 

घटनेचे वृत्त कळताच गटशिक्षणाधिकारी अशोक बिºहाडे, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, स. पो. नि. अवतारसिंग चव्हाण यांनी शाळेत भेट दिली. शिक्षणाधिकाºयांना ही घटना समजल्यावर त्यांनी उपजिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. गायकवाड यांना शाळेत चौकशीसाठी पाठवले तर बिºहाडे यांनी मुली व पालकांचे जबाब घेतले.
यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही भ्रमणध्वनीवरून उपसरपंच मुरलीधर महाजन यांना पालकांच्या सोबत असल्याचे सांगितले. मधुकर माली, मनोज चौधरी, अशोक बाविस्कर, शेतकी संघ संचालक पिंटू राजपूत, अतुल नेमाडे यांच्यासह अनेक पालक हजर होते.
घटना गंभीर असून शिक्षकाला तात्काळ निलंबित करून त्याचा बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवावा. कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाउपशिक्षणाधिकारी ए. बी. गायकवाड यांनी भेटी प्रसंगी सांगितले.

Web Title: Locked to the school, the parents locked up the girl child in the Kalmsare case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.