जामनेर येथे आयुष्यमान योजनेचे कार्ड वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 05:40 PM2019-02-19T17:40:08+5:302019-02-19T17:41:08+5:30

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्र्थींंना कार्डचे व राष्ट्रीय कुटुुंंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत २९ लाभार्र्थींना प्रत्येकी २० हजाराच्या धनादेशाचे वाटप सोमवारी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

Life Insurance scheme allocation at Jamner | जामनेर येथे आयुष्यमान योजनेचे कार्ड वाटप

जामनेर येथे आयुष्यमान योजनेचे कार्ड वाटप

Next
ठळक मुद्दे२९ लाभार्र्थींना प्रत्येकी २० हजारांच्या धनादेशांचे वाटपसंजय गांधी निराधार योजनेसाठी आलेले दीड हजार अर्ज मंजूर

जामनेर, जि.जळगाव : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत तालुक्यातील लाभार्र्थींंना कार्डचे व राष्ट्रीय कुटुुंंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत २९ लाभार्र्थींना प्रत्येकी २० हजाराच्या धनादेशाचे वाटप सोमवारी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
बाबाजी राघो मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. संजय गांधी निराधार योजनेसाठी आलेले १ हजार ५०० अर्ज मंजूर झाल्याचे या समितीचे अध्यक्ष नवल पाटील यांनी यावेळी सांगितले. भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गोविंद अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.
पंचायत समिती सभापती रुपाली पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुनीता पाटील, नीता पाटील, संगीता पिठोडे, बेबाबाई भुसारी, जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, उपनगराध्यक्ष अनिस शेख, नाजीम शेख, आतिष झाल्टे, बाबूराव हिवराळे, अ‍ॅड.शिवाजी सोनार, नायाब तहसीलदार परमेश्वर कासुडे, तुकाराम निकम, सुरेश बोरसे, उल्हास पाटील, एकनाथ लोखंडे, संजय देशमुख, रमण चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार रवींद्र झालटे
नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांची बदली झाल्याने साधना महाजन यांनी त्यांचा सत्कार केला.

Web Title: Life Insurance scheme allocation at Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.