अमळनेर येथे गावठी दारुच्या सात हातभट्या नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:31 PM2018-10-19T12:31:33+5:302018-10-19T12:32:15+5:30

दोन महिलांना अटक

At least seven dead dogs of ammunner were destroyed in Amalner | अमळनेर येथे गावठी दारुच्या सात हातभट्या नष्ट

अमळनेर येथे गावठी दारुच्या सात हातभट्या नष्ट

Next
ठळक मुद्देअमळनेर पोलिसांची कामगिरी१२ हजार ६०० रुपयांचा माल जप्त

अमळनेर, जि. जळगाव : विजयादशमीच्या दिवशी अमळनेर पोलिसांनी चोपडा रोड, धरणगाव रोड, खलेश्वर कांजरवाडा येथील ७ हाततभट्ट्या उध्वस्त केल्या. दोन महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले
दसऱ्याच्या दिवशी सकाळी पोलीस निरीक्षक अनिल बदगुजर यांच्या मार्गदशनखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, पोलीस नाईक विजय साळुंखे, किशोर पाटील, प्रमोद बागडे, रवी पाटील, योगेश पाटील, हितेश चिंचोरे महिला कॉन्स्टेबल रेखा ईशी, नाजीमा पिंजारी यांनी खलेश्वर कंजरवडा,धरणगाव रास्ताव चोपडा रस्त्यावरील गावठी हातभट्टीवर छापे टाकून सात हटभट्ट्या उध्वस्त केल्या. कच्च्या रसायनाच्या ड्रम फेकले व इतर साहित्याची मोडतोड करून ९५० लिटर कच्चे रसायन, प्लॅस्टिक कॅन मधील ६० लिटर दारू असा १२ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करून सीमा रमेश कंजर, कोमल मनोज कंजर या दोन महिलांवर गुन्हा नोंदवून अटक केली. तपास हेडकॉन्स्टेबल सुभाष साळुंखे करीत आहेत.

Web Title: At least seven dead dogs of ammunner were destroyed in Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.