फैजपूर येथे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या हवाई सर्वेक्षणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 08:06 PM2018-08-13T20:06:36+5:302018-08-13T20:08:57+5:30

तापी नदीवर साकारण्यात येणाऱ्या मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या हवाई सर्वेक्षणाचा शुभारंभ सोमवारी फैजपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

 Launch of Mega Recharge Project's Air Survey at Fazpur | फैजपूर येथे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या हवाई सर्वेक्षणाचा शुभारंभ

फैजपूर येथे मेगा रिचार्ज प्रकल्पाच्या हवाई सर्वेक्षणाचा शुभारंभ

googlenewsNext
ठळक मुद्देधनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला शुभारंभखासदार, आमदारांसह अधिकाºयांची उपस्थिती

फैजपूर : तापी नदीवर साकार होणाºया आणि महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाºया मेगा रिचार्ज प्रकल्प अर्थात महाकाय पुनर्भरण योजनेच्या हवाई सर्वेक्षणाचा शुभारंभ सोमवारी सकाळी नऊ वाजता धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला.
खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, व हा प्रकल्प साकार करणाºया तापी विकास महामंडळाचे अधिकारी यांच्या हस्ते नारळ फोडून व हेलिकॉप्टरवर लावलेल्या आधुनिक यंत्रसामुग्रीची पूजा करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात तापी विकास महामंडळाचे निवृत्त अभियंता व्ही. डी. पाटील यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.
या वेळी हिरालाल चौधरी, हर्षल पाटील, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, संजय गांधी योजना अध्यक्ष विलास चौधरी, राज्य माहिती आयुक्त व्ही. डी.पाटील, अधिक्षक अभियंता आनंद मोरे, कार्यकारी अभियंता जी.एस.महाजन, कार्यकारी अभियंता धनंजय पाटील, सहायक कार्यकारी अभियंता मनोज वाकचौरे, के.पी. पाटील, सेवानिवृत उपविभागीय अभियंता, एम.के.महाजन, नितीन राणे, पप्पू चौधरी, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थीत होते.
दरम्यान, या योजनेचा शुभारंभ झाला असला तरी ढगाळ वातावरणामुळे प्रत्यक्ष सर्वेक्षणाला १४ आॅगस्टपासून सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाने दिली.
 

Web Title:  Launch of Mega Recharge Project's Air Survey at Fazpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी