लडाख आॅन व्हील्स : अमळनेरच्या अधिकाऱ्याची पत्नीसह बुलेटवर लडाखस्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:37 PM2018-12-12T12:37:04+5:302018-12-12T12:37:19+5:30

बुलेटवरच भूतानची वारी

Ladakh and Wheels: on the bullet | लडाख आॅन व्हील्स : अमळनेरच्या अधिकाऱ्याची पत्नीसह बुलेटवर लडाखस्वारी

लडाख आॅन व्हील्स : अमळनेरच्या अधिकाऱ्याची पत्नीसह बुलेटवर लडाखस्वारी

Next

चुडामण बोरसे
जळगाव : कला आणि छंदातून माणसाचे व्यक्तीमत्व घडत असते. पर्यटनासारखा वेगळा छंद जोपासत अमळनेर येथील अजित मुठे आणि नेहा मुठे या दाम्पत्याने थेट बुलेटवर लडाखवर स्वारी केली.
मे २०१८ मध्ये लडाखचा हा रोमांचकारी अनुभव घेत हे दाम्पत्य परतले आहे.
मुठे हे अहमदनगर येथे स्पेशल आॅडीटर म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य नाशिक येथे आहे. यापूर्वी गेल्या वर्षी त्यांनी बुलेटवरच भूतानची वारी केली होती.
अजित यांना लहानपणापासूनच पर्यटनाचा छंद आहे. दरवर्षी ते नवीन ठिकाणी सपत्नीक भटकंती करीत असतात... विशेष म्हणजे ही भटकंती बुलेटवर असते.
मे २०१८ मध्य नाशिक ते श्रीनगर हा रेल्वेने प्रवास. नंतर श्रीनगर येथूून या जोडप्याने बुलेट भाड्याने घेतली. याच बुलेटवरुन जवळपास १६०० किलोमीटरचा खडतर प्रवास केला. यात मग श्रीनगरसह कारगील, लेह असे अनेक अनेक टप्पे पार करीत बुलेटस्वारी पूर्ण केली.
या बुलेटस्वारीत सर्वात खडतर प्रवास झाला तो ‘झोजीला पास’ चा. काश्मीरच्या लडाख सेक्टरला जोडणारा हा सर्वात धोकादायक व अखंड बर्फ असलेला रस्ता. या झोजीला पासबाबत असे म्हटले जाते की, ‘झोजिला मे नही गिरे, तो क्या गिरे’अशा या वेड्यावाकड्या वळणाच्या अत्यंत खडतर रस्त्यावर बुलेट चालविताना देव आठविल्याशिवाय राहत नाही. हा पासही या जोडप्याने सहज पार केला.
अजित यांच्या गु्रपमध्ये ४६ जण होते. त्याच आठ जोडपी होती. जी बुलेटवर होती, त्यात केरळहून पाच, गुजरातहून दोन व महाराष्ट्रातून अजित आणि त्यांच्या पत्नी. बाकी सर्व यंग बॉईज कर्नाटका, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश येथून आलेले होते.
सन १९९९ च्या युद्धाने आपल्याला कारगिल माहित झाले. मात्र प्रत्यक्षात वर्षानुवर्षे आपले जवान शत्रूशी निसर्गाशी, प्रतिकुल परिस्थितीत तोंड देऊन दिवसरात्र जाता पहारा देत असतात.
कारगिल, बटालीक व द्रास असे सेक्टर आहे. यातील कारगिल सेक्टरमध्ये टायगर हिल, द्रास सेक्टरमध्ये टोलोलिंग ही शिखरे आहेत. या ठिकाणी कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन मनोज पांडे, रायफलमन संजयकुमा२२र, योगिदरसिंग यादव यांनी पराक्रमाची शर्थ केली होती. या ठिकाणी कॅप्टन मनोज पांडे स्मारक आहे.
यासर्व विरांना ‘मानाचा मुजरा’ अर्पण करून कारगिल येथे मुक्काम झाला. आणि ११ दिवसांचा लडाख प्रवास सुखकर तेवढाच रोमांचकारी आणि आठवणीत राहिल, असा झाला.
अजित हे २०१२ मध्ये काश्मीर गेलो होते. त्यावेळ जागोजागी व ५०, १०० मीटर्स अंतरावर जवान बंदोबस्तासाठी उभे होते. त्यावेळची काश्मीरची परिस्थिती धगधगती होती. आता २०१८ साली फारच कमी बंदोबस्त दिसला. लाल चौकातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते आणि तेथे फक्त १०-१५ पोलीस होते. हे बदलेले चित्र सुखदायक असल्याचा अनुभव ते सांगतात.

Web Title: Ladakh and Wheels: on the bullet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव