अडावद येथे शॉर्ट सर्कीटमुळे घराला लागलेल्या आगीत हजारोचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, November 09, 2017 6:00pm

केजीएननगरातील एका घराला अचानक आग लागून लाखाचे नुकसान झाले. दि. 9 रोजी दुपारी 2-30 वाजेच्या सुमारास ही आग लागली. चोपडा येथील अग्निशमन दलाचा बंबाने आग आटोक्यात आणली.

लोकमत ऑनलाईन

अडावद ता.चोपडा, दि.9 - येथील केजीएननगरातील एका घराला अचानक आग लागून लाखाचे नुकसान झाले. दि. 9 रोजी दुपारी 2-30 वाजेच्या सुमारास ही आग लागली. चोपडा येथील अग्निशमन दलाचा बंबाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही.

यावल-चोपडा रस्त्यावरील केजीएन नगरातील रहिवासी अब्दुल गफ्फुर पिंजारी यांच्या घराला गुरूवारी दुपारी अचानक आग लागली. घरातून धुराचे लोळ निघू लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. आग विझविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य जहांगीर पठाण, मेहरबान तडवी, इम्रान बेग, शकील शहा, कालू मिस्तरी, इकबाल खाटीक, फारुक पिंजारी, जहांगीर तडवी आदींनी प्रय} केले. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्याने आग आटोक्यात येत नव्हती. अखेर चोपडा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंबास पाचारण करण्यात आले. अवघ्या 15 मिनिटात बंब दाखल झाला. अगAीशमन दलाच्या कर्मचा:यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. मात्र तोपयर्ंत घरातील टिव्ही, फ्रिज, कपाट, अन्नधान्यासह आदी संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यामुळे पिंजारी यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे पिंजारी कुटुंबाचे म्हणणे आहे.

संबंधित

आगीत दोन घराचे नुकसान; म्हशीही जखमी
घरकुल सर्वेक्षणात परभणी आघाडीवर
टिळक राेडवरील तुळशी अपार्टमेंटला अाग ;जीवितहानी नाही
लुधियानामध्ये कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, चार जणांचा मृत्यू
परभणी : प्रभाग समितीतून मिळणार हस्तांतरण प्रमाणपत्र

जळगाव कडून आणखी

जामनेर तालुक्यातील कापूसवाडीच्या ६ जणांना १० वर्षे सक्तमजुरी
जळगाव जिल्ह्यात एक दिवसात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
कळमोदे येथे शुभारंभानंतर तासाभरातच रस्त्याच्या कामाला ‘ब्रेक’
बोदवड येथे स्वस्त धान्य दुकानातील साठ्यात तफावत
मुक्ताईनगर येथे भारिप-बहुजन महासंघाचा मोर्चा

आणखी वाचा