ज्ञान, जिद्द, परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोनातून यश मिळते : प्रांताधिकारी दीपमाला चौरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:48 PM2019-07-17T18:48:24+5:302019-07-17T18:49:46+5:30

आॅनलाइन शिक्षण प्रणालीत आपल्याला टिकायचे असेल तर आहे त्या साधन सामग्रीचा वापर करून ज्ञान, जिद्द, परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोनातून यश संपादन करावे लागेल, असे मार्गदर्शन प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी केले.

Knowledge, Jidda, diligence and positive outlook are a success: Provincial Deepamala Choure | ज्ञान, जिद्द, परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोनातून यश मिळते : प्रांताधिकारी दीपमाला चौरे

ज्ञान, जिद्द, परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोनातून यश मिळते : प्रांताधिकारी दीपमाला चौरे

Next
ठळक मुद्देशेंदुणी गरुड संस्थेचा अमृत महोत्सव उत्साहातविद्यार्थ्यांचा गुणगौरव

शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : आॅनलाइन शिक्षण प्रणालीत आपल्याला टिकायचे असेल तर आहे त्या साधन सामग्रीचा वापर करून ज्ञान, जिद्द, परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोनातून यश संपादन करावे लागेल, असे मार्गदर्शन प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांनी केले.
आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-आॅप सोसायटीचा ७५वा वर्धापन दिवस (अमृत महोत्सव) उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय गरुड होते. प्रमुख अतिथी प्रांताधिकारी दीपमाला चौरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, जि.प.सदस्या सरोजनी गरुड, जि.प.चे माजी सदस्य सागरमल जैन, पंचायत समिती सदस्य डॉ.किरण सूर्यवंशी, पंचायत समिती माजी सदस्य शांताराम गुजर, सुधाकर बारी, संस्थेचे संचालक यु. यु .पाटील, सहसचिव दीपक गरुड, मुक्तीमनोहर काझमी, प्राचार्य डॉ.व्ही.आर. पाटील, नगरसेविका मोहसिना खाटीक, फारुख खाटीक, नगरसेविका भावना जैन, योगेश गुजर, रमेश जैन यासह गावातील विविध मान्यवर उपस्थित होते.
विविध विभागात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या व ग्रंथपाल यमराज गरुड यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेल्या हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले.
सूत्रसंचालन पी. जी .पाटील, प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.आर.शिंपी यांनी केले. सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन डी.बी.मस्के यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक सुहास जैन यांनी आभार मानले.

Web Title: Knowledge, Jidda, diligence and positive outlook are a success: Provincial Deepamala Choure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.