खान्देशी खाद्य संस्कृती सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 05:48 PM2018-12-22T17:48:03+5:302018-12-22T17:48:58+5:30

कुठलेली कार्य म्हटले म्हणजे जेवणावळ ही आलीच. आपल्याकडे एक पद्धती रूढू आहे ती म्हणजे कोणत्याही कार्यक्रम आला की पंगत ठरलेली. म्हणतात ना ‘मरण दारी की तोरण दारी’ पंगती या बसतातच. आणि या पंगतींना मेनू ठरलेला. हा मेनू विभागनिहाय बदलतो.

Khandeyan Food Culture Satasamprayapar | खान्देशी खाद्य संस्कृती सातासमुद्रापार

खान्देशी खाद्य संस्कृती सातासमुद्रापार

Next

चंद्रशेखर जोशी
कुठलेली कार्य म्हटले म्हणजे जेवणावळ ही आलीच. आपल्याकडे एक पद्धती रूढू आहे ती म्हणजे कोणत्याही कार्यक्रम आला की पंगत ठरलेली. म्हणतात ना ‘मरण दारी की तोरण दारी’ पंगती या बसतातच. आणि या पंगतींना मेनू ठरलेला. हा मेनू विभागनिहाय बदलतो. काही भागात वरण, पोळी वांग्याची भाजी असते, काही भागात बट्टी व घोटलेल्या वांग्याची भाजी असते विभागनिहाय खाद्य संस्कृती ही बदलते. मात्र बहुतांश भागात एक भाजी ठरलेली ती म्हणजे वांग्याची भाजी. खान्देशी वांगे हे राज्यात प्रसिद्ध आहेत. जळगाव जिल्ह्यातील व्यक्ती पुण्या-मुंबईकडे जायला निघाली की ज्यांच्याकडे जाणार त्या व्यक्तीचा एक निरोप हमखास असतो तो म्हणजे येतांना भरताची वांगी घेऊन आणि हिवाळा असला की मेहरूणची बोरेही ठरलेली. खान्देशी भरताची गोडी काही औरच असल्याचे सर्वत्र बोलले जाते. त्यामुळेच विविध संस्थांतर्फे आयोजित केली जाणारे संमेलने होतात त्यावेळी भरीत हा मेनू ठरलेला असतो. अगदी देशभरातून आलेल्या व्यक्ती भरतावर ताव मारतात. बोटे चोखीत या खाद्याची स्तुुती करतात. भरताचे हे खाद्य आता केवळ जळगाव जिल्ह्यापर्यंत मर्यादीत राहीले नाही तर त्याच्या चवेची चर्चा ही जगभरात पोहोचणार आहे. याला निमित्त ठरले ते शहरातील मराठी प्रतिष्ठान. खान्देशी वाग्यांचे भरीत जगप्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राच प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जळगावातील सागर पार्क मैदानावर २५०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी सतत सहा तास परिश्रम करून तीन हजार किलो भरीत बनविण्याचा विक्रम केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक्स आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व लिमका बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. ‘लार्जेस्ट मेकींग आॅफ एगप्लांट’ या नावाने या रेकॉर्डची नोंद दोन्ही संस्थांमध्ये होणार आहे. यासाठी मराठी प्रतिष्ठानचे प्रमुख विजय वाणी, अ‍ॅड. जमिल देशपांडे यांनी गेल्या काही काळात अविरत परिश्रम घेतले. या निमित्ताने जळगावच्या भरीताची चर्चा आता जागतिक पातळीवर झाली आहे. खान्देशातील खाद्य संस्कृतीच्या शिरोपेचात एक मानाचा तुरा यानिमित्ताने रोवला गेला आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, मराठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जळगावकरांच्या सहकार्याने हा उपक्रम अतिशय यशस्वी करून दाखविला. हजारो जळगावकर या क्षणाचे साक्षीदार झाले व बहुतांश नागरिकांनी भरताची चव चाखत. तयार करण्याच्या पारंपरीक पद्धतीला दाद दिली.

 

Web Title: Khandeyan Food Culture Satasamprayapar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.