पारोळा येथे जैन मुनीश्रींचा दीक्षा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:45 PM2019-02-19T22:45:08+5:302019-02-19T22:45:29+5:30

पारोळा : आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांचे परमशिष्य परमपूज्य मुनीश्री १०८ अक्षयसागरजी महाराज यांचा दिक्षादिन उत्साहात साजरा करण्यात ...

Jana Munishri's initiation day at Parola | पारोळा येथे जैन मुनीश्रींचा दीक्षा दिन

पारोळा येथे जैन मुनीश्रींचा दीक्षा दिन

Next

पारोळा : आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांचे परमशिष्य परमपूज्य मुनीश्री १०८ अक्षयसागरजी महाराज यांचा दिक्षादिन उत्साहात साजरा करण्यात आला. अक्षयसागरजी महाराज यांच्या मुनी दिक्षाला २१ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पारोळयातील हत्ती गल्लीमधील श्री विद्यासागर त्यागी भवन येथे विविध धार्मिक कार्यक्रम झाले .
१९ रोजी सकाळी मंदिरात अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पूजन, मंगलाचरण, शास्त्र भेट, तत्वार्थ सूत्र परीक्षा वितरण करण्यात आले. मुनीश्री अक्षयसागरजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून उपदेश दिला.
राष्ट्रीय महामार्गालगत किसान महाविद्यालयासमोर किर्ती स्तंभाचे भूमिपूजन मुनीश्री अक्षयसागरजी महाराज, मुनीश्री १०८ नेमीसागरजी महाराज, क्षुल्लक रत्नश्री १०५ समता भूषण महाराज यांच्या उपस्थितीत खासदार ए. टी. पाटील, नगराध्यक्ष करण पवार, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र्र बोहरा, नगरसेवक मनिष पाटील, नवल चौधरी, संजय पाटील यांनी कुदळ मारून भूमीपूजन केले. या वेळी सकल दिगंबर जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी जैन समाजातर्फे शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Jana Munishri's initiation day at Parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव