जामनेरला तरुणास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 02:30 PM2018-09-17T14:30:01+5:302018-09-17T14:31:13+5:30

१७ हजार लांबविले : गुन्हा दाखल

 Jamner drops the youth drunkenly | जामनेरला तरुणास बेदम मारहाण

जामनेरला तरुणास बेदम मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हा दाखल न झाल्याने काही नगरसेवक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी पोलीस ठाण्यातमारहाण करणाºयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

जामनेर, जि.जळगाव : गुरे शोधणाऱ्या एका तरुणास चौघांनी बेदम मारहाण करीत पोलीस ठाण्यात आणले. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वाकी रोडवरील खासगी व्यापारी संकुलाच्या आवारात घडली.
रस्त्यावर बसलेल्या मोकाट गुरांना मालकांनी ताब्यात घेण्याबाबत जाहीर सुचना दिली होती. याअनुशंगाने तौसीफ शेख युसुफ (वय १६) हा त्याची गुरे शोधत असताना त्याने वाकीरोडवरील व्यापारी संकुल परिसरात बसलेली गाय घेऊन जात असताना तेथे असलेल्या २० ते २५ जणांनी त्यास हटकले व मारहाण करण्यास सुरुवात केली व पोलीस ठाण्यात आणले. याचवेळी तौसीफचा भाऊ सद्दाम शेख युसूफ त्याला शोधत आला असता त्यालादेखील मारहाण झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती शहरात समजताच तौसीफचे नातेवाईक व नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले व तौसीफला मारहाण करणाºयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने काही नगरसेवक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमा झाले.
अखेर रात्री साडेसातचे सुमारास तौसीफ यास मारहाण करणाºया अज्ञात तरुणांविरुध्द भा.दं.वि. कलम ३२३, ५०४, ४२७ अन्वये गुन्हा दाखल झाला. दरम्यान, तौसीफला मारहाण होत असताना त्याच्या खिशातील १७ हजार लांबविल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


 

Web Title:  Jamner drops the youth drunkenly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.