जळगाव मनपा निवडणूक : वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म बदलवण्यावरुन गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 01:09 PM2018-07-12T13:09:57+5:302018-07-12T13:11:12+5:30

शिवसेनेची तक्रार

Jalgoan Municipal Election: After the end of time, the change of AB form is confusion | जळगाव मनपा निवडणूक : वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म बदलवण्यावरुन गोंधळ

जळगाव मनपा निवडणूक : वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म बदलवण्यावरुन गोंधळ

Next
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांनी तपासले मनपातील सीसीटीव्ही फुटेजचार वाजता पुन्हा आली मनपात कार

जळगाव : भाजपा आमदारांनी दुपारी २.३० वाजता एबी फॉर्म दिल्यानंतर पुन्हा दुपारी मुदत संपल्यानंतर ४ वाजता भाजपाने काही उमेदवारांचे एबी फॉर्म बदलवल्याचा आरोप शिवसेनेच्या काही पदाधिकाºयांनी केल्याने मनपात गोंधळ झाला. या प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून मनपा आयुक्तांकडे तक्रार केली.
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मनपामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारी २ वाजता शिवसेनेकडून शहर संघटक दिनेश जगताप यांनी आपल्या ७५ उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर केले. त्यानंतर दुपारी २.३० वाजता आमदार सुरेश भोळे यांनी भाजपच्या ७५ उमेदवारांचे एबी फॉर्म सादर केले. त्यामुळे दोन्ही पक्षांनी वेळेच्या आतच एबी फॉर्म दाखल केले होते. मात्र, त्यानंतर भाजपाकडून दुपारी चार वाजता काही उमेदवारांचे एबी फॉर्म परत घेवून त्यांच्या जागेवर इतर उमेदवारांसाठी एबी फॉर्म दिल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक चेतन शिरसाळे यांनी केला.
दुपारी ४ वाजता दोन पदाधिकाºयांनी आणले एबी फॉर्म
चेतन शिरसाळे यांच्या आरोपानुसार दुपारी ४ वाजता जी. जे.०५, जे. एफ.६०६६ या क्रमांकाच्या कारमधून भाजपचे दोन पदाधिकारी मनपात दाखल झाले. तसेच त्यांच्याकडे भाजपच्या काही उमेदवारांचे एबी फॉर्म होते. या आधी दुपारी आमदारांनी दिलेल्या मतदार यादीमधील काही उमेदवारांचे एबी फॉर्म परत घेवून त्यांच्या जागेवर इतर उमेदवारांसाठीचे एबी फॉर्म परत देण्यात आले. मात्र, तोपर्यंत मुदत संपली होती असे शिरसाळे म्हणाले.
आयुक्तांची घेतली भेट
सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शिवसेना पदाधिकाºयांनी मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रकांत डांगे यांची भेट घेत चौकशीची मागणी केली. त्यावर डांगे यांनी असला कोणताही प्रकार झाला नसल्याची माहिती दिली. तरीही तथ्य आढळल्यास चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले. मात्र, शिवसेना पदाधिकारी आरोपांवर ठाम होते.
सीसीटीव्ही व चित्रीकरण तपासले
निवडणूक निर्णय अधिकाºयांनी शिवसेना पदाधिकाºयांचे आरोप फेटाळून लावले. मात्र, शिवसेना पदाधिकारी ठाम असल्याने मनपाकडून झालेले चित्रीकरण तपासण्याची मागणी केली. निवडणूक अधिकाºयांच्या परवानगीने सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. यामध्ये दुपारी ४ वाजता जी.जे.०५,जे.एफ.६०६६ क्रमांकाची कार मनपा परिसरात येते,मात्र त्यामधून भाजपाचे कोणते पदाधिकारी उतरले हे स्पष्ट झाले नाही.
शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मनपात दाखल
वेळ संपल्यानंतर भाजपाने एबी फॉर्म बदलवल्याबाबत माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार आर.ओ.पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिलीप दळवी, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, शहर संघटक दिनेश जगताप, राहुल नेतलेकर मनपात दाखल झाले. तसेच निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे तक्रार केली.

Web Title: Jalgoan Municipal Election: After the end of time, the change of AB form is confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.