रिमझिम पावसाने जळगावकर सुखावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 07:35 PM2018-06-26T19:35:28+5:302018-06-26T19:42:47+5:30

मंगळवारी २६ जून रोजी सकाळी रिमझिम पावसाला सुुरुवात झाली. दिवसभरात दर दोन तासाला हजेरी लावणाºया पावसाने सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक दमदार हजेरी लावल्यामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते.

Jalgaonkar dried with drizzle drizzle | रिमझिम पावसाने जळगावकर सुखावले

रिमझिम पावसाने जळगावकर सुखावले

Next
ठळक मुद्देठिकठिकाणच्या रस्त्यांवर साचले पाणीसंततधार पावसामुळे वातावरणात गारवाशेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरुवात

जळगाव : सोमवारी रात्री झालेल्या पावसानंतर मंगळवारी २६ जून रोजी सकाळी रिमझिम पावसाला सुुरुवात झाली. दिवसभरात दर दोन तासाला हजेरी लावणाºया पावसाने सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक दमदार हजेरी लावल्यामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यामुळे शाळेला जाणाºया विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. पावसामुळे शहरातील सर्व भागातील सखल रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.
दोन दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्याने शेतकºयांनी पेरणीची तयारी केली. सकाळीच शेतकºयांनी शेतात धाव घेत पेरणीला सुरुवात केली. काही ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने शेतात वाफसा नव्हता. त्यामुळे शेतकºयांना माघारी परत यावे लागले.

Web Title: Jalgaonkar dried with drizzle drizzle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.