जळगावातील गिरणा पंपिंगच्या जागी आता लवकरच होणार पर्यटनस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:50 PM2019-07-20T12:50:28+5:302019-07-20T12:50:51+5:30

अंदाजपत्रक बनविण्याचा सूचना

Jalgaon will soon be the tourist destination of Girnar Pumping | जळगावातील गिरणा पंपिंगच्या जागी आता लवकरच होणार पर्यटनस्थळ

जळगावातील गिरणा पंपिंगच्या जागी आता लवकरच होणार पर्यटनस्थळ

Next

जळगाव : मनपाच्या बंद पडलेल्या गिरणा पंपीगच्या जागेवर वॉटरपार्कसह पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी शासनाच्या पर्यटन विकास मंत्रालयाने हिरवा कं दील दिला आहे. मनपाकडून याबाबत अंदाजपत्रक तयार करण्याचा सूचना दिल्या आहेत. स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी याबाबत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्र पाठवून मागणी केली होती.
राज्य शासनाकडून अंदाजपत्रक तयार करण्याबाबत आदेश मिळाल्यानंतर शुक्रवारी या जागेची पाहणी करण्यात आली. यात स्थायी समिती सभापती मराठे, शहर अभियंता सुनील भोळे, पाणी पुरवठा अभियंता डी. एस. खडके व विकास आराखडा तयार करून देणारे वास्तुविशारद किशोर पाटील यांनी या गिरणा पंपीगच्या जागेची पाहणी केली. पंधरा दिवसात हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र मराठे यांनी दिली.
मनपाच्या उत्पन्नांचा स्त्रोत वाढेल
गिरणा नदीच्या पात्राजवळच लागून मनपाची आठ एकर जागा आहे. याठिकाणी आधी मनपाचे रॉ वॉटर स्टेशन व जलशुद्धीकरण केंद्र होते. मात्र, हे केंद्र अनेक बंद पडले असून, या जागेचा कोणताही वापर सध्या होत नाही.त्यामुळे या जागेवर पर्यटनस्थळ विकसीत करून वॉटरपार्क तयार केल्यास शहरवासियांना देखील फायदा होणार असून, यासह मनपाच्या उत्पन्नाचा स्त्रोत देखील वाढणार आहे. लवकरच गिरणा नदीवर सात बलून बंधारे तयार केले जाणार आहेत. त्यात एक बंधारा राष्टÑीय महामार्गाच्या बायपाससाठी तयार होणाऱ्या पुलाखालून होणार असल्याने या बंधाºयाचे बॅक वॉटर गिरणा पंपीगपर्यंत येणार आहे. त्यामुळे शहरवासियांसाठी नवीन पर्यटनस्थळ विकसीत होण्यास मदत होणार आहे.
जुन्या सामुग्रीची विक्री करणार
गिरणा पंपीगच्या ठिकाणी मनपा मालकीची जुनी यंत्र सामुग्री धुळखात पडली आहे. या जुन्या मशिनरीचा लिलाव करून विक्री करण्यात येणार आहे.महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत ‘वॉटर पार्क व पर्यटन स्थळ तयार करण्यासाठी वास्तुविशारद म्हणून किशोर पाटील यांची नेमणूक केली आहे. यासाठी गिरणा नदीपात्राजवळील पाणी उचलकरून ‘वॉटरपार्क’ तयार करण्यात येणार असून, यात वॉटर डायव्हींग, वॉटर फॉल, रेन डान्सींग वॉटर, म्युजीक वॉटर तसेच नदी पात्रात बोटींग, विश्रामगृहाची सुविधा केली जाणार आहे.

Web Title: Jalgaon will soon be the tourist destination of Girnar Pumping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव