शित वा-यांचे प्रमाण वाढल्याने जळगावचा पारा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:29 PM2017-11-25T15:29:11+5:302017-11-25T15:35:04+5:30

उत्तर भारतात यंदा पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाल्याने राज्यात पून्हा शितलहर पसरली आहे. १६ ते १७ अंशापर्यंत गेलेला जळगावचा रात्रीचा पारा पून्हा घसरायला सुरुवात झाली असून, थंडी चांगलीच झोंबायला लागली आहे.

Jalgaon was reduced due to the increase in the number of cold | शित वा-यांचे प्रमाण वाढल्याने जळगावचा पारा घसरला

शित वा-यांचे प्रमाण वाढल्याने जळगावचा पारा घसरला

Next
ठळक मुद्देरात्रीचा पारा १३ अंशावर आठवड्याभरात थंडीची लाटथंड वारे व धुक्याचे प्रमाण वाढले

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२५ -उत्तर भारतात यंदा  पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाल्याने  राज्यात पून्हा शितलहर पसरली आहे. आठवडाभरापासून १६ ते १७ अंशापर्यंत गेलेला जळगावचा रात्रीचा पारा पून्हा घसरायला सुरुवात झाली असून, थंडी चांगलीच झोंबायला लागली आहे. दरम्यान पुढील आठवड्यात जळगावचा पारा आणखीन घसरण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.


यंदा थंडीचे प्रमाण कमी-जास्त प्रमाणात पहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिन्याचा पहिल्याच आठवड्यात जळगावचा पारात १२ अंशापर्यंत आला होता. मात्र त्यानंतर पून्हा तापमानात वाढ झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात कश्मिर, हिमाचल प्रदेशच्या काही भागात बर्फवृष्टी झाल्याने राजस्थान, मध्यप्रदेशसह महाराष्टÑात देखील उत्तरेकडील शित वाºयांमुळे थंडी वाढली आहे.


पारा आणखीन घसरणार
दरम्यान, आठवड्याभरात उत्तरेकडून येणाºया थंड वा-यांचे प्रमाण वाढल्याने जळगावच्या पारा आणखीन घसरण्याचा अंदाज आहे. जळगावचे किमान तापमान ११ ते १२ अंशापर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच शनिवारी राज्यात सार्वाधिक कमी तापमान १२ अंश नाशिक शहराचे होते. त्याखालोखाल १३ अंश जळगावच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. महाबळेश्वरचे तापमान १५ अंश, तर अहमदनगरचे तापमान १५.७ अंश इतके होते.


थंड वारे व धुक्याचे प्रमाण वाढले
शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी वातावरणात काही प्रमाणात धुके पहायला मिळाले. तसेच वाºयांचा वेग देखील वाढला होता. जळगावात ७ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने थंडी चांगलीच बोचत होती.पारा घसरल्याने हरभरा, गहू या रब्बी पिकांना देखील फायदा होत आहे. पुढील आठवड्यात जरी पारा घसरणार असला तरी मात्र डिसेंबर महिन्याचा पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात जळगावात पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.


मॉर्नींग वॉकसाठी गर्दी वाढली
हिवाळा म्हटला की, आरोग्यासाठी हितवर्धक असतो. त्यामुळे सकाळच्या वेळेस व्यायाम करणाºयांचा संख्येत देखील वाढ झालेली दिसुन येत आहे सकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावर मॉर्नींग वॉक साठी येणाºयांची गर्दी वाढत आहे. तसेच विविध आरोग्यवर्धक काढा विक्री करणाºयांची वर्दळ देखील पहायला मिळत आहे. तसेच वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकल्याचा रुग्णांमध्ये वाढ झाली असून रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत.ात बर्फवृष्टी झाल्याने राजस्थान, मध्यप्रदेशसह महाराष्टÑात देखील उत्तरेकडील शित वाºयांमुळे थंडी वाढली आहे.

 

 

 

Web Title: Jalgaon was reduced due to the increase in the number of cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.